आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या भरून घ्या टॅक्स रिटर्नचा फॉर्म; टीआरपी कर्मचारी तुमच्या घरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयकर दाखल करण्यासाठीचा लांबलचक व किचकट फॉर्म भरणे तुम्हाला दिव्य वाटत असेल तर यंदा त्यातून तुमची सुटका होऊ शकते. करदाता रिटर्न भरण्यासाठी टॅक्स रिटर्न प्रिपेयर (टीआरपी) या कर्मचाºयाकडून फोनवर सल्ला मागू शकेल, तोही अगदी मोफत. इतकेच नव्हे तर टीआरपीएसच्या वेबसाइटवर होम व्हिजिटसाठीही नोंदणी करता येऊ शकेल, अशी यंत्रणा आयकर विभाग विकसित करत आहे. आठवडाभरात ही सुविधा सुरू होण्याची आशा आहे.
आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जर एखाद्या करदात्यास आॅनलाइन रिटर्न भरताना काही अडचणी वाटल्या तर तो विभागाची हेल्पलाइन 18001023738 वर फोन करून कर तज्ज्ञांकडून सल्ला घेऊ शकतो. या सल्ल्यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. यानंतरही फॉर्म भरण्यात अडचणी येत असतील तर करदाता टीआरपीएसच्या वेबसाइटवर जाऊन टॅक्स रिटर्न प्रिपेयर्स (टीआरपी) या कर्मचाºयास घरी बोलावण्यासाठी आॅनलाइन रिक्वेस्ट नोंदवू शकतो. घरी येऊन फॉर्म भरण्यासाठी टीआरपीला 250 रुपये शुल्क द्यावे लागेल. मात्र, या सेवेचा लाभ फक्त वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंबेच (एचयूएफ) घेऊ शकतील.
आधी टीआरपीएसच्या कार्यालयांतच ही सेवा मिळत होती. यंदापासून होम व्हिजिट सेवेचीही सुरुवात करण्यात येत आहे. लघु आणि मध्यम करदात्यांना रिटर्न फॉर्म भरण्यात मदत व्हावी म्हणून आयकर खात्याने 2008 पासून टीआरपी योजना सुरू केली होती. यानुसार आयकर खात्यामार्फत प्रशिक्षित व्यक्तींना आयकर भरण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. या सेवेसाठी टीआरपींना 250 रुपये प्रतिफॉॅर्म मानधन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र टीआरपी फक्त वैयक्तिक आणि एचयूएफचेच रिटर्न फॉर्म भरू शकतील, अशी अटही घालण्यात आली आहे. या फॉर्मला 1961 कलम 44 एबी अन्वये लेखापरीक्षणाची गरज नाही, अशी माहिती अधिकाºयांनी दिली. योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यात एकूण 5000 टॅक्स प्रिपेयर्सची निवड करण्यात येणार आहे.