आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत ठेवी, इन्फ्रा बाँड, होम लोनच्या माध्यमातून करा करबचत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्राप्तिकर बचतीसाठी बँकांच्या पाच वर्षांच्या मुदत ठेवी, इन्फ्रास्ट्रक्चर बाँड तसेच गृह कर्ज (होम लोन) अत्यंत उपयुक्त अशी साधने आहेत. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत बँकांच्या पाच वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींद्वारे कर बचत करता येते. सध्या अशा मुदत ठेवींवर 9.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवता येते. आर्क फायनान्शियल प्लॅनरचे सीईओ आणि सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर हेमंत बेनीवाल यांनी सांगितले की, अल्प तसेच मध्यम अवधीचे उद्दिष्ट असणारे आणि शेअर बाजारातील जोखीम पत्करण्याची तयारी नसणा-यांसाठी मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) हा पर्याय कर बचतीसाठी उत्तम पर्याय आहे. कमी कर बसणाºया वर्गासाठीही एफडी हा एक चांगला पर्याय आहे. या पर्यायाचे वैशिष्ट्ये म्हणजे एफडीत गुंतवण्यात येणाºया रकमेवर करबचतीचा लाभ मिळतो मात्र यावर मिळणाºया व्याजावर मात्र कर लागतो.
इन्फ्रास्ट्रक्चर बाँड : पायाभूत रोखे (इन्फ्रास्ट्रक्चर बाँड) करबचतीसाठी उपयुक्त ठरतात. कलम 80 सीसीएफ अंतर्गत यातील गुंतवणुकीवर 20,000 रुपयांचा अतिरिक्त करबचतीचा लाभ मिळतो. अलीकडेच अनेक कंपन्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर बाँड बाजारात आणले आहेत. एल.अँड.टी., आयडीएफसी आणि श्रेई इन्फ्रा या कंपन्यांनी लाँग टर्म इन्फ्रा बाँड बाजारात आणले आहेत. यावर मिळणारा परतावाही आकर्षक आहे. कलम 80 सी शिवाय करबचतीसाठी 80 सीसीएफचा फायदा घेण्यासाठी इन्फ्रा बाँडमध्ये 20,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
होम लोन मुद्दल आणि व्याज परतफेड : गृहकर्ज (होम लोन) परतफेडीत मूळ रकमेवर (प्रिंसिपल) कलम 80 सी अंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत कर बचतीचा लाभ मिळतो. याचा दावा करण्यासाठी कर्जदात्या बँकेकडून मिळणारे कर्ज विवरण पत्र (स्टेटमेंट) सादर करणे आवश्यक असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 24 (बी) अ नुसार हाउसिंग लोनच्या व्याज परतफेडीवर दीड लाखापर्यंतची कपात मिळू शकते. आपला पैसा डॉट कॉमचे सीएफओ बलवंत जैन यांनी सांगितले की, या संदर्भात एक अट आहे की, कर्जदात्याने या घराचे पजेशन कर्ज घेतल्यापासून तीन वर्षांच्या आत त्या घराचे पजेशन घ्यायला हवे. अन्यथा दीड लाखाची मर्यादा घटून 30 हजारांपर्यंत येईल, हे लक्षात घ्यावे. तसेच घराची दुरुस्ती, पुनर्बांधणी किंवा विस्तार यासाठी कर्ज घेतले असल्यास कलम 24 सी अंतर्गत व्याज कपातीवरील लाभ मिळू शकतो. यासाठीही 1.5 लाखांची मर्यादा आहे.
कलम 24 (सी) आणि दुसरे घर : जैन यांनी सांगितले की, जर आपण दोन घरांचे मालक असाल आणि एक घर आपण किरायाने दिले असेल तर हाउसिंग लोनच्या व्याजावर मिळणाºया प्राप्तिकर बचतीसाठी कोणतीही मर्यादा नाही. यासाठी व्याजापोटी देण्यात येणारी पूर्ण रक्कम करबचतीच्या कक्षेत येते. मात्र, दुसºया घराच्या किरायापोटी मिळणारी रक्कम आपल्या एकूण उत्पन्नात दाखवणे आवश्यक आहे.
असा मिळतो लाभ
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 24 (बी) अ नुसार हाउसिंग लोनच्या व्याज परतफेडीवर दीड लाखापर्यंतची कपात मिळू शकते.
करबचतीसाठी 80 सीसीएफचा फायदा घेण्यासाठी इन्फ्रा बाँडमध्ये 20,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत बँकांच्या पाच वर्षे मुदतीच्या मुदत ठेवींद्वारे करबचत करता येते.