आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taza Plaza's Initiative : Now Fresh Vegatable Get At Home

‘ताजा प्लाझा’चा उपक्रम: आता ताजी भाजी थेट घरी मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जीवनावश्यक वस्तू विशेष करून फळे आणि भाजीपाल्याची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ही भाववाढ रोखण्यासाठी अलीकडेच राबवण्यात आलेल्या चालत्या फिरत्या किरकोळ विक्री दुकान संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या मुंबई आणि उपनगरांपुरती र्मयादित असलेली ही सेवा आता राज्यस्तरीय पातळीवर राबवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ, स्टार अँग्रिवेअर हाऊसिंग, कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड आणि फ्युझिऑन आयएनसी प्रा.लि. यांच्या सार्वजनिक खासगी भागीदारीतून ‘ताजा प्लाझा’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. ‘ताजा प्लाझा’ ही आगळीवेगळी व्हॅन आहे. देशातील हवामानाचा अंदाज घेऊन ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. विशेष करून भाज्या, फळे आणि इतर बहुराष्ट्रीय उत्पादने विशिष्ट नियंत्रित पर्यावरणामध्ये या व्हॅनमध्ये साठवली जातात.

सध्या ही मोबाइल व्हॅन सुविधा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरार, पनवेल, नेरुळ , डोंबिवली या भागात आहे, परंतु आता पुढील 24 महिन्यांत राज्यात 250 ‘ताजा प्लाझा’ व्हॅन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंच्या विशेष करून भाज्या आणि फळे यांच्या किमती नियंत्रणाखाली ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण होतील आणि शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळेल यादृष्टीने हा अभिनव उपक्रम फायदेशीर ठरेल असा विश्वास कृषिमंत्री विखे पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.


फायदा काय
0 रिटेल ऑन व्हिल्स दुकाने गृहनिर्माण संस्था, वर्दळीच्या चौकांपर्यंत पोहोचतील परिणामी गृहिणींना या व्हॅनमध्येच जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येऊ शकतील.
0 स्पर्धात्मक किंमत आणि ताजेपणाची कंपनीकडून खात्री.
0 स्थानिक शेतकर्‍यांकडून माल थेट खरेदी केल्याने उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत.
0 मध्यस्थांना टाळून जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समूहाकडून शेतमालाची थेट खरेदी.


स्थिर किमती
ताजा प्लाझा उपक्रमामुळे रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती दीर्घकाळासाठी स्थिर राहतील. विशेष करून फळे, भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील 36 महिन्यांमध्ये संपूर्ण देशभरात विविध राज्यांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यासाठी साखळी उभारण्याचा मानस कंपनीच्या संस्थापक, कार्यकारी संचालक शर्मिला बॅनर्जी यांनी या वेळी व्यक्त केला.