आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीसीएस अव्वल, ७ कंपन्यांच्या बाजारमूल्यात ३६,८४० कोटींनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सेन्सेक्सच्या अव्वल १० पैकी ७ कंपन्यांच्या बाजार मूल्यात एकूण ३६,८४०.४१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात टीसीएसचे बाजार मूल्य सर्वाधिक वाढले आहे, तर ओएनजीसी, रिलायन्स आणि सन फार्मा यांचे बाजारमूल्य घसरले आहे.
कंपनीनिहाय बाजार भांडवल (मार्केट कॅप) वाढ
मागील आठवड्यात आयटीसीचे बाजार भांडवल १०,०१५.७८ कोटी रुपयांहून वाढून २,३९,८४९.२९ कोटी रुपयांवर पोहोचले.
> कोल इंडियाचे बाजार भांडवल ७,४५३.३१ कोटी रुपयांच्या वाढीसह २,२५,१७८.३९ कोटींवर पोहोचले.
> एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप ७,३१७.३६ कोटी रुपयांनी वाढून २,२४,४२३.२० कोटी झाले आहे.
> टीसीएसचे बाजार भांडवल ६,३६५.८६ कोटी रुपयांनी वाढून ५,१०,४४४.५१ कोटींवर पोहोचले आहे.
> एसबीआयचे बाजार मूल्य ३,४४१.७ कोटी रुपयांनी वाढून २,०८,१७८.१७ कोटी रुपये झाले.
> इन्फोसिसचे बाजार भांडवल १,१२८.३७ कोटींनी वाढून २,४०,५१०.२० कोटी रुपयांवर पोहोचले.
> आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य १,११८ कोटींनी वाढून १,९६,२११ कोटी झाले आहे.
या कंपन्यांच्या भांडवलात घट :
मागील आठवड्यात ओएनजीसीला सर्वाधिक फटका बसला व त्यांचे बाजार भांडवल १३,६०३.२३ कोटी रुपयांनी घटून ३,३६,५३०.२० कोटी रुपयांवर आले.
> रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ३८००.९ कोटी रुपयांनी घसरून ३,१३,५०१.२८ कोटींवर आले आहे.
> सन फार्माचे बाजार भांडवल १,०६६.६२ कोटींनी घटून १,८३,६०३,३८ कोटी रुपयांवर आले आहे.
टीसीएस पहिल्या क्रमांकावर अव्वल
सेन्सेक्समधील १० कंपन्यांच्या क्रमांकात काहीच बदल झालेला नाही. बाजार भांडवलाच्या आधारे टीसीएस पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
टीसीएस
ओएनजीसी
रिलायन्स
आयटीसी
इन्फोसिस
कोल इंडिया
एचडीएफसी बँक
एसबीआय
आयसीआयसीआय बँक
सन फार्मा