आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Technical Fault In Share Market, Business News In Marathi

शेअर बाजाराच्या नेटवर्कमधील बिघाड दुरुस्त; तब्बल अडीच तासांनी काम सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाडानंतर जवळपास अडीच तासांनंतर शेअर बाजाराचे कामकाज पुन्हा सुरु झालेे. बीएसईमधील सर्व सेगमेंटमधील ट्रेडिंग सुरु झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (बीएसई) गुरूवार सकाळी नेटवर्क आउटेज झाल्यामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे आधीच्या सर्व ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. नेटवर्क सर्व्हिस वेंडर 'एचसीएल'च्या टेक्नीकल टीमने बिघाड दुरुस्त केल्याचे बीएसईचे सीईओ आशिष चौहान यांनी सांगितले.

दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे गुरुवार सकाळी मुंबई शेअर बाजाराचे कामकाज ठप्प झाले होते. सिस्टिममध्ये डाटा अपडेट होत नसल्याचे आढळून आले. परिणामी काम थांबवण्यात आले होते.

बाजार उघडताच निर्देशांकात 87 अंकांची वाढ दिसून आली. मात्र, त्यानंतर नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि सिस्टिममध्ये कुठलाही डाटा अपडेट होऊ शकला नव्हता. बिघाड लक्षात येण्यापूर्वी निर्देशांक 25928 वर पोहोचला होता. नेटवर्क आउटेज झाल्यामुळे सर्व सेगमेंटमधील ट्रेडिंग बंद करण्यात आली होती. परंतु, ब‍िघाड दुरुस्तीनंतर बीएसईच्या सर्व सेगमेंटमधील ट्रेडिंग सुरु झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

(फाइल फोटो: शेअर मार्केटची इमारत)
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, शेअर मार्केटमध्ये.23 दिवसांत दुसर्‍यांदा झाला बिघाड...