आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Technology: Robbery Immediately You Know By Mobile

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंत्रज्ञान: हात लावताच मालकाला मोबाइल करणारी नवी तिजोरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महत्त्वाचे दस्तऐवज किंवा अन्य किमती चीजवस्तू सुरक्षित कशा ठेवाव्यात याची चिंता सगळ्यांनाच असते. त्यातून छोट्या कुटुंबांचे वाढते प्रमाण, कामानिमित्त घराबाहेर जाणारा जास्त वेळ या सगळ्या गोष्टींमुळे या किमती वस्तू सुरक्षित ठेवण्याची गरज वाढली आहे. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सने ‘आय वॉर्न’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवी तिजोरी वाजारात आणली आहे. कारण चोरी झाल्यास या तंत्रज्ञानामुळे तिजोरीतील अलार्म वाजतो आणि साहजिकच चोरांना चोरी करण्यापासून रोखण्यास मदत होते.


या तिजोरीचा वापर करणा-या व्यक्तींना योग्य वेळेस सूचना मिळावी आणि कोणत्याही प्रकारची हानी होण्याआधी ती व्यक्ती सावध व्हावी या उद्देशाने या उत्पादनाची निर्मिती करण्यात आलेली असल्याचे कंपनीच्या विपणन विभागाचे सहायक उपाध्यक्ष मेहरनोश पिथावाला यांनी सांगितले. नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे, सातत्याने घराबाहेर राहणा-यांसाठी ही नवी तिजोरी हा एक त्यावर चांगला उपाय ठरू शकतो.


तिजोरीचे वेगळेपण
० चोरी आणि आग प्रतिबंधक तिजोरीमध्ये नवीन तंत्रज्ञान
० घरात वापरली जाणारी पहिलीच तिजोरी
० व्हायब्रेशन सेन्सर्समुळे या तिजोरीस हात लावायचा प्रयत्न झाल्यास लगेच अलार्म वाजतो
० आधीच नोंदवुन ठेवलेल्या दूरध्वनी क्रमांकांवर एसएमएस किंवा रेकॉर्डेड व्हॉइस मेसेजद्वारे संदेश पाठवला जातो.
० तिजोरीची बांधणी मजबूत आणि दुहेरी भिंतींनी केलेली
०मॅटिक्स सेफ विथ आय-वॉर्न तंत्रज्ञानामुळे, तिजोरी फोडण्याचा झाल्यास घरमालकास त्वरित मोबाइल क्रमांकावर सूचना दिली जाते.