आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनासाठी सहाराने नवी योजना सांगावी,एजन्सीमार्फत विक्री करण्याचे सुप्रीम कोर्टाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहारा समूहाकडून विदेशातील मालमत्ता विक्री प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आता हे प्रकरण एखाद्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे सोपवण्याबाबत न्यायालय विचार करते आहे. या संदर्भातील प्रत्येक वेळी काही ना काही अडचणी येत आहेत. त्यात अडकून पडायचे नसून न्या. बी. एन. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीला याची चौकशी करण्यास सांगण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दहा हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवणा-या कंपन्या बनावट पत्र देत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. या कंपन्या आहेत तरी कशा, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. सहाराच्या मालमत्ता विक्रीचे प्रकरण मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे कसे देता येईल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमित्र शेखर नफाडे यांच्याकडे विचारणा केली आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत न केल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय एक वर्षापासून कारागृहात आहेत. त्यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाने १० हजार कोटी रुपये जमा करण्याची अट ठेवली आहे. याची पूर्तता करण्यासाठी समूह तीन हॉटेल्स विकण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी सहाराने अमेरिकेतील मीराच कॅपिटल बरोबर सौदा केला होता. समूहाने भारतीय वंशाचे सारांश शर्मा यांच्या हस्ते न्यायालयाला एक पत्र दिले, त्यात बँक ऑफ अमेरिकेला सौद्योतील बँकर म्हटले होते. मात्र बँक ऑफ अमेरिकेने हे पत्र बनावट असल्याचे सांगितले.

मीराच कॅपिटलने सौदा मोडला, शुल्क परत
सहाराबरोबरचा तीन हॉटेलसाठीचा सौदा मोडला असल्याचे मीराच कॅपिटलने म्हटले आहे. मीराचने यासंदर्भातील २६.२५ लाख डॉलरचे (१६.२ कोटी रुपये) शुल्कही परत केले आहे. मात्र न्यूयॉर्कमधील दोन आणि लंडनमधील एक हॉटेल खरेदीसाठी पुन्हा एकदा २.०५ अब्ज डॉलरचा (१२,७०० कोटी) प्रस्ताव दिला