Home | Business | Gadget | tension free because of mobile

मोबाइलद्वारे करा तणाव दूर!

दिव्य मराठी | Update - Apr 06, 2012, 10:57 PM IST

सिंपली बिइंग एक असे अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याची किंमत फक्त एक डॉलर म्हणजे भारतीय चलनात फक्त 45 रुपये इतकी आहे.

 • tension free because of mobile

  आता मोबाइलला अशा अ‍ॅप्लिकेशन्सची जोड दिली जात आहे की, ते तुमचा तणाव कमी करण्यासाठी, मेडिटेशनसाठी मदत करतात. त्यामुळे झोप न येण्याचा आजार दूर होण्यास मदत होते. असे अ‍ॅप्लिकेशन्स बहुतांश मोबाइलवर उपलब्ध आहेत आणि दिवसातील काही मिनिटे याचा वापर करून तणाव दूर करू शकतात. ‘सिम्पली बिइंग’ आणि ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’ यात प्रमुख आहेत.
  सिंपली बिइंग एक असे अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याची किंमत फक्त एक डॉलर म्हणजे भारतीय चलनात फक्त 45 रुपये इतकी आहे. हा अ‍ॅपल, अँड्रॉइड आणि ब्लॅकबेरीमध्ये उपलब्ध आहे.
  प्राणायाम फ्री नावाचे एक अ‍ॅप्लिकेशन तर अ‍ॅपल आणि अँड्रॉइडवर मोफतपणे उपलब्ध आहे. हेसुद्धा तणाव दूर करण्यास मदत करते. मेडिटेशन हे अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला शांत झोप आणि डोके शांत ठेवण्यास मदत करते.
  मोबाइलसारख्या टेक्निकल डिव्हाइसलाच तणावाचे कारण मानले जाते, पण म्युझिक ऐकल्यानंतर त्याचा बराचसा तणाव दूर होतो. भारतीय संस्कृतीचं देणं असलेल्या प्राणायामचा आता जगभरात वापर होतो आहे. प्राणायाम फ्री नावाचे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅपल आणि अँड्रॉइडमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. मात्र, हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेण्यास वेळ लागतो. तो तुम्हास प्रतिमिनिट सात वेळा, पाच तसेच चार वेळेस श्वास सोडण्याची प्रक्रिया सांगेल. ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांना पिज्ज स्लीप अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे. अ‍ॅपलवर उपलब्ध या अ‍ॅप्लिकेशनची किंमत 6 डॉलर आहे.
  याशिवाय तणाव दूर करण्यासाठी अनेक अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण ते थोडे महाग आहेत. मायो क्लिनिक इन्सॉम्निया वेलनेस सोल्युशन्स खूप चांगले आहे. याची किंमत 25 डॉलर आहे. मेडिटेशनचे अ‍ॅप्लिकेशन डोके थंड ठेवण्यास मदत करते.
  प्राणायाम फ्री सर्वसाधारण अ‍ॅप्लिकशन असून ते थोडे महाग आहे. हे तुम्हाला संपूर्ण व्यायामाच्या वेळी मार्गदर्शन करेल. मेडिटेशन आणि शांत झोप लागण्यासाठी बरीच मदत करेल.
  तुम्ही तुमचा आयफोन उचलून त्यात सिंपली बिइंग हे अ‍ॅप्लिकेशन उचलाल तेव्हा तुमच्यासमोर चार ऑप्शन्स येतात. ज्याला मेडिटेशनसाठी निवडाल त्यात 5, 10, 15 आणि 20 मिनिट असे ऑप्शन्स येतात. पहिल्या दिवशी 5 मिनिटांची सोय करा. त्यानंतर वेळ वाढवत न्या. तुम्हाला त्याचा फायदाच होईल.
  तुम्ही नैसर्गिक ध्वनी किंवा संगीत यापैकी एकाची निवड करू शकता. प्रोग्रामकडून मिळणा-या निर्देशानुसार तुम्ही निवांतपणे मेडिटेशन करू शकता. यात ध्वनीचेही काही प्रकार ऐकण्यास मिळतील. ज्याप्रमाणे आई आपणास अंगाई गाऊन झोपवत होती. अशा आकर्षक ध्वनीमध्ये आता संवाद ऐकण्यास मिळतील. पाच मिनिटांतच तुम्हाला निवांत झोप येऊ लागेल.
  मेडिटेशन या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उद्घोषकाच्या आवाजाला उत्तर देण्याची कोणाची इच्छा होणार नाही. त्यामुळे माइंडफूलनेस मेडिटेशन हा दुसरा पर्याय आहे. यात उद्घोषक त्याचे काम तो स्वत: करतो. ही क्रिया ध्यानमुद्रेत समाधान पोहोचवते. यात उद्घोषकाच्या साथीला कोणत्याही प्रकारचा ध्वनी किंवा संगीत नाही; पण सिंपली बिइंगच्या तुलनेत जास्तीचे कंटेंट असतात. यात युजर्स 5, 10, 15, 20 आणि 30 मिनिटांचे मेडिटेशन तुम्ही निवडू शकता. ध्यानाची सर्वात चांगल्या अवस्थेबाबतीत यात माहिती दिली जाते.
  मायो क्लिनिक अ‍ॅप्लिकेशनसुद्धा बरेच उपयुक्त आहे. निद्रानाशाच्या उपचारावर तुम्ही जास्तीचा खर्च करताच, पण हे अ‍ॅप्लिकेशन फक्त 25 डॉलरमध्ये उपलब्ध आहे. आयपॅड वापरणा-यांसाठी असे अ‍ॅप्लिकेशन उपयोगी आहे.

Trending