आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरी वाहन विक्रीच्या वाढीने वितरण सेवेवर ताण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देशात लक्झरी मोटारींच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने देखभाल-दुरुस्तीचीही मागणी वाढली असून त्याचा मोटार वितरण सेवा केंद्रांवर ताण येत असल्याचे ‘जे.डी. पॉवर इंडिया’च्या एका अहवालात दिसून आले आहे. यातून ग्राहक समाधानाचा आलेखही कमी झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षात १६,८०४ लक्झरी मोटारींची विक्री झाली. परंतु या वर्षात ही विक्री १२२ टक्क्यांनी वाढून ३५,५४१ मोटारींवर गेली आहे. या विक्रीच्या चढत्या आलेखामुळे लक्झरी मोटार उत्पादक कंपन्यांच्या वर्कशॉप्समध्ये ग्राहकांना समाधानी ठेवता येण्याइतपत सेवेची पातळी उंचावणे सध्या अवघड जात असल्याचे लक्झरी गाड्यांविषयी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासाचे हे दुसरे वर्ष असून त्यामध्ये लक्झरी मोटारीच्या मालकांना मोटार घेतल्यानंतर पुढच्या १२ ते २४ महिन्यांत देखभाल-दुरुस्तीसाठी अधिकृत वितरण सेवा केंद्राला भेट दिल्यानंतरचा अनुभव विचारला जातो.

भारतातील लक्झरी गाड्यांची विक्री २०१३ मधल्या १६,८०४ युनिट्सवरून २०१४ मध्ये ११२ टक्क्यांनी वाढून ३५,५४१ युनिट्सवर गेली आहे. नव्या गाड्यांच्या विक्रीत भरपूर वाढ झाल्यामुळे लक्झरी गाड्या उत्पादकांच्या वर्कशॉप्सना ग्राहकाचे समाधान करण्याइतपत आपल्या सेवेची पातळी वाढवणे अवघड जात आहे. भारतामध्ये लक्झरी मोटारींची विक्री वाढल्यामुळे वर्कशॉप, तेथील पायाभूत सुविधा आणि प्रक्रियेवर ताण येत असल्याचे जे.डी. पॉवरच्या आशिया प्रशांत विभागाचे (सिंगापूर) कार्यकारी संचालक मोहित अरोरा यांनी सांगितले. मोटारी सर्व्हिसिंगसाठी नेलेल्या २५७ ग्राहकांनी दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये हा अहवाल तयार करण्यात आला.