आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बाइकच्या किमतीत येतील 11 नॅनो कार, \'थन्डरबर्ड एलटी\' लॉन्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या आठवड्याभरात अनेक टू व्हीलर लॉन्च झाल्या. यात यामाहाच्या 'फेजर'पासून बजाजच्या 'केटीएम'पर्यंत सर्व दूचाकींचा समावेश आहे. यामध्ये अशी एक बाइक आहे की, त‍िच्या किमतीत तब्बल 11 नॅनो कार येतील. चला जाणून घेऊया या बाइक विषयी...

ट्रिम्फ थन्डरबर्ड एलटी
ट्रिम्फ मोटरसायकलने 'थन्डरबर्ड एलटी' लॉन्च केली आहे. दिल्ली एक्सशोरूममध्ये 'थन्डरबर्ड एलटी'ची किमत 15.75 लाख रुपये आहे. या बाइकचे इंजिन 1699 सीसीचे आहे. हे इंजिन लिक्विड कूल्ड असून 5400 आरपीएम वर 94 बीपीएस इतकी पॉवर देते. 3550 आरपीएम वर 151 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. बाइकचे फ्युयल टॅंक 22 लीटरचे आहे. ट्रिम्फ थन्डरबर्डचे वजन 339 किलोग्रॅम आहे.

टाटा नॅनोची एक्सशोरूम किमत 1.41 लाख रुपये आहे. त्यामुळे एका ट्रिम्फ थन्डरबर्ड एलटीच्या किमतीत जवळपास 11 टाटा नॅनो येऊ शकतात. बजाजच्या 'पल्सर 150'च्या तुलनेत थन्डरबर्ड एलटीचे इंजिन 11 पटींनी पॉवरफूल आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अन्य दोन पॉवरफूल बाइकविषयी...