आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज झाला जगातील पहिल्या Keypad टेलिफोनचा जन्म, वाचा, आतापर्यंतच्या फोन्सची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९६० ते ७० च्या दशताकील कीपॅड फोनचे स्वरूप
आज स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात दिसतो.काही वर्षापूर्वीतर या विनाबटनाच्या टेलिफोनची कल्पना करणेही शक्य नव्हते. मात्र तंत्रज्ञानाच्या विकासाने आणि मानवी कल्पनाशक्तीने ते शक्य होऊ शकले. पण तुम्हाला माहिती आहे का आजच्याच दिवशी म्हणजेच १८ नोव्हेंबर १९६३ ला बेल कंपनीने जगातील पहिला पुश कीपॅडचा टेलिफोनचा शोध लावला. त्यापूर्वी जगात गोल रिंग असलेले टेलिफोन अस्तित्वात होते. मात्र अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी टेलिफोनमध्ये संशोधन करत ड्यूअल टोन मल्टी फ्रिक्वेंन्सी (DTMF)तंत्रज्ञानावर आधारीत हा कीपॅड असेलला फोन शोधून काढला आणि टेलिफोन क्षेत्रात क्रांन्ती झाली.
या कीपॅड संशोधनामुळे अगदी लहान फोनही निर्माण करता आले. यामध्ये कॉर्डलेस, मोबाईल, क्वेर्टी कीपॅड अशा अनेक फोनची निर्मिती शक्य झाली. या फोन्समध्ये अनेक सुविधा होत्या. पुर्वीच्या रिंग असलेल्या फोनवर रिडायलचे बटन नव्हते. मात्र कीपॅड फोन आल्याने रिडायलची सुविधा प्राप्त झाले.त्यासोबतच मोबाईल आणि क्वार्डलेसवर प्रत्येक बटनावर ३-५ इंग्रजी अक्षरे नोंदवरून नावे संग्रहीत करण्याची सुविधाही दिली गेली. मात्र आता या सर्व गोष्टींमध्ये प्रचंड विकास झाला असून कॉम्प्यूटर युगानेतर आता कीपॅड लेस म्हणजेच टच स्क्रीन स्मार्टफोन अस्तित्वात आणले आहेत. तरीही अनेकांना या कीपॅडचा मोह अजून केल्या काही सुटत नाही. तरीही आज जगातील जवळपास सर्वाधीक टेलिफोन हे कीपॅड तंत्रज्ञानावरच आधारीत आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, इतर विंटेज फोन्स आणि त्यांची माहिती