आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाचे च‍िन्ह आता लवकरच दिसणार नोटांवर!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: भारतीय रुपयाला चिन्हामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत नवी ओळख मिळाली आहे. आता लवकरच रुपयाचे चिन्ह चलनात येणार्‍या नवीन नोटांवर दिसणार आहे, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे.10 रुपये, शंभर रुपये, पाचशे रुपये आणि हजार रुपयांच्या नवीन नोटांवर रुपयाचे चिन्ह असेल.
गेल्या वर्षी मुंबई आयआयटीमधील डी. उदयकुमार यांनी सुचवेलल्या रुपयाच्या चिन्हावर शिक्का मोर्तब झाला होता. आता हे रुपयाचे चिन्ह असलेल्या नोटा लवकरच चलनात येणार आहे. 2005 मध्ये चलनात आलेल्या महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटांच्या डिझाइनप्रमाणेच या नव्या नोटांचे डिझाईन असून त्यात आता रुपयाच्या चिन्हाची भर घालण्यात आली आहे. भारतीय चिन्ह हे देवनागरीतील 'र' आणि रोमन लिपीतील 'आर' या शब्दांपासून तयार झाले आहे. गेल्या वर्षी या चिन्हाला मंजुरी मिळाल्यानंतर भारताचा 'रूपया' आंतरराष्‍ट्रीय चलन डॉलर, युरोप, पॉंड आणि येन यांचा पंक्तित जाऊन बसला आहे. रुपयाचे चिन्ह असलेले नाणे यापूर्वीच चलनात आले आहे. आता रुपयाचे चिन्ह नोटांवर दिसणार आहे.
रुपयाचे अवमूल्यन : काही कंपन्यांना तारक, काहींना मारक