आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The SOLAR POWERED Laptop That Could Be Charged Within Two Hours

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक्नॉलॉजीचा चमत्कार: सूर्याच्या उन्हातही चार्ज होईल लॅपटॉप!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग समजले जातेय. तंत्रज्ञानाच्या युगात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. प्रत्येक मिनिटाला नवीन शोध लागतोय. याला तंत्रज्ञानाचाच आविष्कार म्हणायचा की मानवी डोक्याला शाबासकी द्यायची, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न..

आता हेच बघाना सूर्याच्या उन्हातही लॅपटॉप चार्ज करता येणार आहे. असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल काय? तुम्ही उलट त्याला वेड्यात काढाल. परंतु खरं सांगायचं झालं तर आजच्या अत्याधुनिक काळात काहीच अशक्य राहीलेलं नाही.

धावत्या जगासोबत प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागतेय. ऑफिस असो अथवा घर, बहुतेकांना आपलं डोकं लॅपटॉपमध्ये खुपसावं लागतंय. अगदी प्रवास करतानाही काही जण लॅपटॉप उघडून बसलेले दिसतात. मा‍त्र अशा परिस्थितीत जर लॅपटॉपची बॅटरी ढूस झाली म्हणजे बोंबलं ना तुमचं महत्तवाचं काम. आता महत्त्वाचं काम ठप्प पडलं म्हणजे त्याचा मनस्ताप हा होणारच.

परंतु आता हा त्रास कायमचा संपणार आहे. प्रवासात असो अथवा घरी तुम्ही तुमचा लॅपटॉप विना विद्युत कनेक्शन चार्ज करता येणार आहे. सूर्याच्या उन्हात चार्ज होणारा लॅपटॉप लवकरच बाजारात दाखल होणार आहे. अवघ्या दोन तासांत तुमच्या लॅपटॉपची बॅटरी पूर्ण चार्ज होईल.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, सूर्याच्या उन्हात चार्ज होणार्‍या लॅपटॉपची झलक !