आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्यांच्या जिद्दीने घातली जगाला गवसणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौदा वर्ष कॅपिसिटर उत्पादन करणा-या कंपनीत नोकरी केल्यानंतर स्वत:चाच उद्योग का सुरू करू नये आपणही लोकांना का रोजगार देवू नये ? असा विचार मनात आला आणि त्या विचाराची जिद्द बनली, पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला, प्रयत्नांची पराकाष्टा केली त्यामुळेच ग्रामीण भागात उद्योग सुरू करणा-या एका उद्योजकाचे उत्पादन आज जगभरातील 47 देशांत निर्यात होत आहे. ही यशस्वी गाथा आहे. सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या ‘रेक्टिफेस कॅपिसिटर्स’ या कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक एम.जी.कुलकर्णी यांची.
कुलकर्णी यांचे वडील सांगलीला आयटीआय मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीला होते. वडिलांच्या कडक शिस्तीत त्यांचे शिक्षण झाल्यानंतर चौदा वर्ष एका कंपनीत चौदा वर्ष नोकरी केली. आपलाही उद्योग असावा या विचाराने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि तीन मित्रांची संयुक्त अशी पॉवरथम कॅपिसिटर्स ही कंपनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या माळेगाव एमआयडीसीत सन 2003 ला सुरू झाली. सन 2009 ला काही कारणांनी कुलकर्णी यांनी भागीदारी सोडून स्वत:ची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जी कंपनी उभी करताना आपणही कष्ट उपसले ती सोडणे त्यांच्याकरिता तसे सोपे नव्हते, पण निर्णय घेतला होता, आता कृती करायची वेळ होती, त्यानुसार सन 2010 ला त्यांनी ‘ रेक्टिफेस कॅपिसिटर्स’ ही नवी कंपनी सुरू केली. जुन्या कंपनीतील शंभर टक्के कामगार कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखवत नव्या कंपनीत दाखल झाले. आज रेक्टिफेस कॅपिसिटर्स ही कंपनी जगातील 47 देशांत ‘कॅपिसिटर्स’ ची निर्यात करते आणि वार्षिक 8.5 कोटींची उलाढाल या कंपनीची आहे. विशेष म्हणजे, तुर्की देशांत कंपनीचे कॅपिसिटर्स तेथे उपलब्ध असलेल्या कॅपिसिटर्स स्पर्धकांच्या तुलनेत सर्वोच्च दराने विक्री होतात. कुलकर्णी यांचे उत्पादनात नव नवे प्रयोग सातत्याने सुरू असल्याने देशात मिसाइल लॉँचिंग उपकरणांतही हे कॅपिसिटर्स वापरले जात आहेत.
एका ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याचा अनुभव आपण घेतला आहे. शासकीय योजनांप्रतीही कुलकर्णी काहीसे नाराज दिसतात, त्यांचा फायदा घेण्यासाठी अनेक अडचणी असून उद्योग वाढीसाठी हे सर्व चित्र बदलणे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे. कंपनीतील बहुतांश कामगारांची आज स्वत:ची घरे असून, घरांसाठी कोणतेही कर्ज त्यांच्या नावावर नसल्याचा अभिमानाने कुलकर्णी सांगतात. ( समवेत फोटो सीआयसीवर टाकला आहे)