आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 किमी मायलेज देणा-या या इलेक्‍ट्रीक कार घडविणार क्रांती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेल तसेच नैसर्गिक वायुच्‍या वाढत्‍या किंमतीमुळे इलेक्ट्रीक कार्सचा पर्याय समोर आला होता. परंतु, या गाड्या अतिशय महागड्या असल्‍यामुळे अगदी मोजक्‍याच गाड्या प्रत्‍यक्ष रस्‍त्‍यावर उतरल्‍या. त्‍यामुळे इलेक्‍ट्रीक कार्सचे युग प्रत्‍यक्षात येण्‍यापूर्वीच संपले की काय असे वाटू लागले आहे. परंतु, कार उत्‍पादक कंपन्‍या वेगळाच विचार करीत आहेत. बॅटरीवर धावणा-या कार्स बाजारात आणण्‍याची योजना कार उत्‍पादक कंपन्‍या आखत आहे. त्‍यामुळे या क्षेत्रात स्‍पर्धा दिसू लागली तर नवल वाटायला नको.

फियट, कॅडिलक, फोर्ड तसेच होंडा या कंपन्‍या इलेक्‍ट्रीक कार्सचे नवे मॉडेल यावर्षी सादर करणार आहेत. गेल्‍यावर्षी दोन मॉडेल्सची विक्री वाढली होती. त्‍यात जनरल मोटर्सची चेव्‍ही व्‍होल्‍टची विक्री तिप्‍पट वाढली. तर निस्‍सानची लीफ या कारची विक्री दिड पटीने वाढली आहे.

या कार्सवर केवळ 10 रुपये खर्च करुन 150 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळविता येतो. कमी किंमतीमध्‍ये अशा कार्स उपलब्‍ध झाल्‍यास क्रांतीच येऊ शकते. गेल्‍या वर्षी कारच्‍या विक्रीमध्‍ये अमेरिकेत इलेक्‍ट्रीक कारचा वाटा 3.5 टक्‍के होता. या कारची एक अडचण आहे. लीफसारख्‍या कारला 125 किलोमीटर चालविल्‍यानंतर चार्ज करावे लागते. चार्ज करण्‍यासाठी अनेक तास लागतात. या बाबतीत सुधारणा केल्‍यास निश्चितच परिणाम दिसून येतील.