Home | Business | Auto | these-five-small-cars-will-hit-indian-roads-soon

भारतीय रस्त्यांवर धावणार लवकरच छोट्या कार

बिझनेस ब्युरो | Update - Jun 14, 2011, 05:28 PM IST

टोयोटो, शेवले बीट, मारुति यांच्या छोट्या कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी तयार आहेत.

 • these-five-small-cars-will-hit-indian-roads-soon

  जर तुम्ही एखादी छोटी कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण येत्या दोन महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत छोट्या कार घेऊन येत आहेत.

  टोयोटो इडियोस लोवा, शेवले बीट डीजल, मारुति स्विफ्ट आणि मारुति सर्वो या छोट्या कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी तयार आहेत.

  टोयोटो इडियोस लोवा ही कार ही जूनच्या शेवटच्या आठवडयात किंवा जूलैमध्ये लॉंच होणार आहे. टोयोटा कंपनीची पहिली छोटी असून तिची किंमत 4,20,00 ते 5,50,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

  शेवले बीट डीजल ही डीजेल व्हर्जन कार असणार आहे. ही भारतातील सर्वात छोटी आणि भारतीय कार बाजाराचा विचार करता इकाँनॉमिकल झोन मधील कार ठरणार आहे.

  मारुति स्विफ्ट ही कार ऑगस्टमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार जुन्या स्विफ्ट सारखीच दिसणार असली तरी तांत्रीकदृष्ट्या खुप वेगळी असणार आहे. या कारचे हॉर्स पावर 85 वरुन वाढवून 87 करण्यात येणार आहे. या कारच्या रंग-रुपात काही बदल होण्याची शक्यता आहे. तसेच किंमत 5 ते 6 लाखा दरम्यान असणार आहे.

  मारुती सर्वो या कारची सगळ्यात जास्त उत्सुकता लागून राहिली आहे. जपानमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली ही कार भारतीयांनाही भूरळ पाडेल अशी कंपनीला आशा आहे. 660 सीसीची ही कार असणार आहे. या कारची किंमतही भारतीय मध्यमवर्गाला आकर्षीत करणारी अर्थात 1.5 ते 2 लाखां दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या कारच्या चाहत्यांनी मारुती सर्वो साठी थोडी वाट बघायला हरकत नाही.

  होंडा ब्राव्हो ही मागील वर्षी दिल्लीच्या ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शीत झाली होती. चांगले मायलेज हे या कारचे वैशिष्टय असणार आहे. ही कार थायलंडमध्ये लाँच झाली असून, लवकरच भारतामध्ये दाखल होईल. होंडा ब्राव्होची किंमत 5 लाखांच्या जवळपास असेल.

Trending