आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Personality Get Crore's Of Salary In Every Year

अबब! केवढा हा पगार; या भाग्यवानांना मिळतो कोटींच्या घरात पगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः वेतन, पगार हे असे शब्द आहेत जे प्रत्येक नोकरदार व्यक्तीला हवेहवेसे वाटतात. नोकरी करणारा बहूतेकजण हा महिन्याच्या पहिल्या तारखेची चातकाप्रमाणे वाट पहात असतो. अनेकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी तर काहींना जास्त वेतन असते. मात्र, जर कोणाचे वेतन वर्षाला 30 कोटी एवढे असेल तर... भूवया उंचावल्या ना... मात्र हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशाच भारतीय व्यक्तींबद्दल ज्यांचे वेतन हे कोटींच्या घरात आहेत. त्यातील काही जण तर अगदी तरूणच आहेत. पाहुयात कोण आहेत ही भाग्यवान लोकं
विशाल सिक्का (सीईओ, इन्फोसिस)
इन्फोसिस या भारतातील अग्रगण आयटी कंपनीचे नवीन सीईओ विशाल सिक्का यांचे वार्षीक वेतन हे 30 कोटींएवढे आहे. याशिवाय इन्‍फोसीस कंपनीमध्‍ये त्यांना 20 लाख डॉलरचे शेअर्स देण्‍यात येणार आहेत. 47 वर्षांचे सिक्का एक ऑगस्‍टपासून सीईओचा पदभार सांभाळणार आहेत. ते सध्‍याचे सीईओ एस. डी. शिबुलाल यांची जागा घेतील.