आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या समभागांवर ठेवा लक्ष : चांगल्या परताव्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयडीएफसी
सल्ला
खरेदी करा
भाव : 124.95
लक्ष्य : 150 रुपये
आयडीएफसीला आता बँकिंगचा परवाना मिळाला असून हे एक उत्तम उदाहरण आहे. कंपनीने 2008 ते 13 या आर्थिक वर्षांत कर्ज वितरणात 23 टक्के सीएजीआर इतकी वाढ नोंदवली आणि 4 टक्क्यांहून जास्तीचे निव्वळ व्याज फायदा प्रमाण राखले. जीएनपीएचे प्रमाण 0.6 टक्के असे नियंत्रणात आहे.
एमआरपीएल
सल्ला
खरेदी करा
भाव : 47.40 रुपये लक्ष्य : 61 रुपये
कंपनीसाठी आगामी काळ कठीण असला तरी त्याही परिस्थितीत एमआरपीएल सुधारणा करण्याची दाट शक्यता असून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा मार्ग शोधण्याचीही शक्यता आहे. यामुळे डिस्टिलेट आणि स्वस्त कच्चे तेलापर्यंत पोहोचण्याची
शक्यता आहे.
कोल इंडिया
सल्ला
खरेदी करा
भाव : 282 रुपये, लक्ष्य : 320 रुपये
कोळसा उत्पादन क्षेत्रात कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. खेळत्या भांडवलाची सुस्थिती आणि कमी खर्चात उत्पादनामुळे कोल इंडियाचा पोर्टफोलिओ उत्तम आहे. सध्या कंपनीचे शेअर्स तुलनेने स्वस्त पातळीत आहेत. त्यामुळे अल्पकाळासाठी हा समभाग खरेदी करावी.
जीव्हीके पॉवर
सल्ला
खरेदी करा
भाव : 12.05 रुपये, लक्ष्य : 15 रुपये
सध्याची स्थिती या शेअर्सच्या मध्यम काळासाठीच्या खरेदीसाठी सकारात्मक आहे. शेअर्सच्या व्हॅल्यूममध्ये मोठी तेजी असून चार्ट पॅटर्न सकारात्मक आहे. साप्ताहिक चार्टनुसार एमएसीडीच्या खरेदीने ताजे संकेत दिले असून शॉर्ट टर्मसाठी सातत्याने तेजी राहण्याची
शक्यता आहे.
ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज
सल्ला
खरेदी करा
भाव : 383.30 रुपये, लक्ष्य : 450 रुपये
मध्यम कालावधीसाठी ग्रीनप्लायचा शेअर सध्या सकारात्मक आहे. हेड अँड शोल्डर पॅटर्ननुसार सध्या हा शेअर तेजीत आहे. मागील आठवड्यात हा समभाग 370 रुपये या अडथळा पातळीच्या वर बंद झाला. मोठ्या घसरणीनंतर समभागाने जोरदार पुनरागमन
केले आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीज
सल्ला
खरेदी करा
भाव : 55.80 रुपये, लक्ष्य : 68 रुपये
हा समभाग वेगाने सुधारणा करतो आहे. मागील दोन आठवड्यांपासून दररोजच्या चार्ट काउंटरवर मजबुती दिसत असून त्यामुळे तेजीचे संकेत आहेत. शेअर तज्ज्ञही यात तेजी दर्शवताहेत. टिळकनगरचा समभाग 68 रुपये या लक्ष्यासाठी खरेदी करणे
आवश्यक आहे.