आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक करताना तात्कालिक गरजा विसरू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामला मुलाच्या कोचिंग क्लासचे शुल्क भरण्यासाठी 50 हजार रुपयांची गरज आहे. त्यांनी बचतीसाठी पीएफ अकाउंट उघडलेले आहे. बचत वाढवण्यासाठी तो दरवर्षी पीएफ खात्यात पन्नास हजार रुपये जमा करतो. त्याच्याकडे सेव्हिंग सर्टिफिकेट, सोने, काही विमा पॉलिसी आणि बँक डिपॉझिटसुद्धा आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये जोखीम असते, असे त्यांचे मत आहे. एवढी बचत असूनही त्याला पन्नास हजार रुपये गोळा करणे कठीण जात आहे. त्याची अडचण खूप साधी आहे. त्याच्याजवळ संपत्ती आहे, पण रोख रक्कम नाही. त्याने खूप विचार करून संपत्ती जमवली आहे, पण त्यातून तत्कालीन गरजा पूर्ण होऊ शकत नाही.


थोड्या पैशांसाठी पीएफ किंवा पीएफएफवर कर्ज काढण्याची त्याची इच्छा नाही. त्याच्या संपत्तीचे मूल्य पाच लाख रुपये आहे, पण तो पन्नास हजार रुपयांचा बंदोबस्तही करू शकत नाही. बचत प्लॅन तयार करताना तत्कालीन गरजा लक्षात घ्यायला हव्यात. शाळेचे शुल्क , काही उपक्रमांसाठीचे शुल्क, घराची सजावट, सण-उत्सव, सुट्या, भेटवस्तू देण्यासाठी जास्त पैशांची बचत करावी लागते. निवृत्तीनंतर पूर्ण करता येण्यासारख्या या गरजा नाही. या गोष्टी वेळच्या वेळेवरच झाल्या पाहिजेत.


पोर्टफोलियो तयार करताना श्रीरामची 20 टक्के
संपत्ती अशी असायला हवी होती, जी सहजपणे विकता येईल. तसेच ती संपत्ती बचत केलेल्या पैशांतून पुन्हा घेता येईल. असा प्लॅन नसेल तर त्याला डिपॉझिट किंवा संपत्तीवर कर्ज घ्यावे लागेल. डिपॉझिटच्या तुलनेत कर्जावर जास्त व्याज द्यावे लागते. संपत्तीतून 9 टक्के उत्पन्न मिळत असेल, तर कर्जावर 12 टक्के व्याज भरण्यात काही अर्थ नाही, पण तात्कालिक गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीरामला असे करणे भाग आहे.