आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस टक्के मोबाइलधारकांची यू-ट्यूबला पसंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - स्मार्टफोन हातात आल्यापासून व्हिडिओ बघण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेष करून यू ट्यूबवर उपलब्ध असलेल्या एकूण व्हिडिओपैकी जवळपास 30 टक्के व्हिडिओ मोबाइलवर बघणे पसंत करत असल्याचे गुगलने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. इतकेच नाही तर स्वत:कडे टॅब्लेट असलेले दर्शक आपला केवळ 20 टक्के वेळ मोबाइलवर खर्च करतात, पण त्या उलट स्मार्टफोनधारी ग्राहक यू ट्यूबवर व्यतित केलेल्या एकूण वेळेपैकी जवळपास एक चतुर्थांश वेळ आपल्या मोबाइलवर व्हिडिओ पाहणे जास्त पसंत करतात.

गुगलने 16 ते 60 वर्षे वयोगटातील जवळपास 2,005 इंटरनेट वापरकर्त्यांच्या आधारावर हे सर्वेक्षण केले असून त्यामध्ये वय, लिंग, इंटरनेटचा वापर या नुसार वर्गवारी निश्चित केल्या आहेत. भारतातील यू ट्यूबच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक आणि त्यांचा जाहिरातदारांना कसा उपयोग होऊ शकतो, हे शोधून काढण्यासाठी गुगलने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात 2000 पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला होता. यू ट्यूबचे देशभरात 70 टक्क्यांहून जास्त दर्शक 35 वर्षांच्या खालील वयोगटातील असून 72 टक्के दर्शक पदवीधर किंवा उच्च पदवीधर असल्याचे दिसून आले आहे. स्मार्टफोन्स वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याने विविध ब्रॅँड्सनादेखील चांगल्या संधी उपलब्ध झाल्या असून विविध स्क्रीन्समधील कनेक्टिव्हिटीमुळे या महत्त्वपूर्ण दर्शक गटापर्यंत पोहोचण्याच्या चांगला मार्ग ब्रॅँड्सना उपलब्ध होणार असल्याचा अंदाज गुगलने व्यक्त केला आहे.

व्हिडिओचे आदानप्रदान ई-मेलद्वारे
* तीन चतुर्थांश भारतीय वेब वापरकर्ते म्हणतात की, ऑ नलाइन व्हिडिओ पाहायचा असेल तर ते यू ट्यूबला पहिली पसंती देतात. तेवढेच भारतीय असे म्हणतात की, यू ट्यूब ही त्यांच्या सर्वात आवडत्या वेबसाइट्सपैकी एक आहे.
* प्रत्येक पाच भारतीय यू ट्यूब वापरकर्त्यांमागील एक वापरकर्ता दररोज व्हिडिओ आशयाची निर्मिती करतात.
* भारतीय यू ट्यूबच्या वापरकर्त्यांपैकी अर्ध्यांहून जास्त वापरकर्ते सोशल नेटवर्क्सवर व्हिडिओचे आदानप्रदान करतात आणि तेवढ्याच प्रमाणातील यू ट्यूबवरील व्हिडिओचे आदानप्रदान ई-मेलद्वारे करतात.