आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा कंपन्यांनी उभारला 45,300 कोटींचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आयपीओ’ बाजारात मरगळ असली तरी यंदा ‘ऑफर फॉर सेल’द्वारे कंपन्यांनी यंदाच्या वर्षात प्राथमिक समभाग बाजारपेठेतून जवळपास 45,300 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निधी संकलनात 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे ‘प्राइम डेटाबेस’ने केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे.मागील वर्षातल्या 36,253 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या वर्षात सार्वजनिक समभाग बाजारपेठेतून सर्वाधिक म्हणजे 45,372 कोटी रुपयांचा निधी उभारला; परंतु 2010 वर्षात उभारलेल्या सर्वाधिक रकमेची पातळी गाठण्यासाठी 99,022 कोटी रुपये कमी पडले.
भांडवल बाजारपेठेवर वर्चस्व दाखवताना सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी 25,354 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. एकूण निधी उभारण्याच्या तुलनेत हे प्रमाण 56 टक्के असून मागील वर्षातल्या 19,679 कोटी रुपांच्या तुलनेतही किती तरी जास्त आहे. यंदाच्या वर्षात प्रामुख्याने ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून निधी उभारण्यावर कंपन्यांनी भर दिला. किमान 25 टक्के सार्वजनिक भागधारणेच्या नियामक गरजांची पूर्ती करून बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ऑफर फॉर सेल या माध्यमातून कंपन्यांना समभाग विक्री करण्याची परवानगी दिली आहे. या संपूर्ण वर्षात उभारण्यात आलेल्या एकूण निधी संकलनामध्ये ऑफर फॉर सेलद्वारे उभारण्यात आलेल्या निधीचे प्रमाण 53 टक्के असल्याचे प्राइम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वी हल्दिया यांनी सांगितले.
ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून समभाग विक्रीला आणणा-या कंपन्या या अगोदरच नोंदणीकृत असतात आणि बाजारभावापेक्षा सवलत देत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणुकदार हा पर्याय स्वीकारतात. या विक्रीतून मिळालेला निधी कंपन्यांकडे न जाता तो भागधारणा विकणा-यांकडे जातो असे हल्दिया यांनी सांगितले.