आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Foodgrains Production Increases, Sharad Pawar Estimation

अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन, शरद पवार यांचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदा देशातील अन्नधान्याचे उत्पादन 2011-12 पीक वर्षातील 259.29 दशलक्ष टनांचा विक्रमी टप्पा ओलांडण्याचा अंदाज कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. फेब्रुवारीमध्ये पीक उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज हाती येईल त्या वेळी त्यात विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होण्याचा अंदाज असेल, असा ठाम विश्वास कृषिमंत्री पवार यांनी ‘आयसीएआर’च्या 85 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलताना व्यक्त केला.
गव्हासारख्या रब्बी पिकांच्या पेरण्यांचा अहवालदेखील उत्साहवर्धक असल्याचे ते म्हणाले. 2011 - 12 या पीक वर्षातल्या जुलै ते जून या कालावधीत अन्नधान्याचे 259.29 दशलक्ष टनांचे विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन झाले होते; परंतु काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यानंतरच्या वर्षात हे उत्पादन काहीसे घसरून 255.36 दशलक्ष टनांवर आले होते. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पेरण्यांमध्ये सुधारणा झाल्याने अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन होण्याच्या आशा उंचावल्या आहेत.