आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफवर यंदा जास्त व्याज मिळण्याचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) चालू आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह ठेवींवर (पीएफ) 8.50 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देण्याचे संकेत दिले. याचा लाभ संघटनेच्या देशभरातील पाच कोटींहून जास्त सदस्यांना होणार आहे. ईपीएफओने 2012-13 या आर्थिक वर्षात पीएफवर 8.50 टक्के व्याज दिले होते. चालू आर्थिक वर्षात यापेक्षा जास्त व्याज देण्याचा संघटनेचा विचार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


या संदर्भात चर्चा करण्यासाठी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक बोलवण्यात येणार आहे. श्रम मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली होणा-या या बैठकीत पीएफवरील व्याजदरांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्क्यांहून जास्त व्याज दिल्यास ईपीएफओला फारसा फटका बसण्याची शक्यता नाही. आर्थिक वर्षाच्या प्रारंभी व्याजदर जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या प्रथेला फाटा बसला आहे.


पीएफवरील व्याजदर
वर्ष व्याजदर
2010-11 9.5 टक्के
2011-12 8.25 टक्के
2012-13 8.50 टक्के