आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Gold Silver, Oil, Foodgrains Become Cheap

दिलासा: यंदा सोने-चांदी, तेल, धान्य होणार स्वस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - यंदा भारतातच नव्हे, तर जगभरातील महागाईचा तोरा कमी होणार आहे. कच्चे तेल, धान्ये आणि सोने-चांदीसह जवळपास सर्व जिनसांच्या (कमोडिटी) कमी होतील, अशी शक्यता जागतिक बँकेच्या कमोडिटी बाजार अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

या अहवालानुसार, मागील सात महिन्यांत कच्च्या तेलात ५५ टक्क्यांहून जास्त घट झाली आहे. यंदा आणखी घसरणीची शक्यता आहे. पुढील वर्षी काही प्रमाणात तेजीची शक्यता आहे. यात मोठ्या प्रमाणात अस्थैर्य असल्याने जागतिक बँकेने कच्च्या तेलातील घटीची आकडेवारी नमूद केलेली नाही. दुस-या महायुद्धानंतरची क्रूडमधील ही तिसरी सर्वात मोठी घसरण आहे. १९८५-८६ मध्ये कच्चे तेल सात महिन्यांत ६७ टक्क्यांनी स्वस्त झाले होते.

खते स्वस्त होणार
खतांच्या किमती यंदा २.१ टक्क्यांनी आणि पुढील वर्षात एक टक्का घसरतील. मागील वर्षी खताच्या किमतीत ११.६ टक्के घट नोंदवण्यात आली. भारत आणि चीनसारख्या काही देशांनी खतांवरील अनुदान कमी करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे खताची मागणी कमी होईल. दुसरीकडे कृषी उत्पादनाच्या किमती घसरल्याने येत्या हंगामात त्याचा पेरा घटणार आहे, अशा प्रकारे खतांच्या किमतीवर दुहेरी दबाव पडणार असल्याचे बँकेने अहवालात म्हटले आहे.

सोने-चांदी ३ टक्के, धातू ५ टक्क्यांनी स्वस्त होणार
मौल्यवान धातूंच्या किमती यंदा तीन टक्क्यांनी, तर पुढील वर्षात एक टक्क्याने स्वस्त होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील वर्षी सोने-चांदीत १२ टक्के घट आली होती. सोन्याच्या किमती आता इतक्या घसरल्या आहेत की, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून असणारी त्याची हमी आता समाप्तीकडे आहे. भारत आणि चीनमधून मागणी कमी आल्याने सोने स्वस्त होत आहे. इतर धातूंच्या किमतीही यंदा ५ टक्क्यांहून जास्त घसरणार आहेत.

पुढे वाचा परिणाम काय होणार?