आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलनीनोच्या प्रभावामुळे देशात यंदा 60 टक्के दुष्काळ - स्कायमेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खासगी हवामान यंत्रणा स्कायमेटने देशात यावर्षी 60 टक्के दुष्काळ पडणार असल्याचे भविष्य वर्तवले आहे. यापूर्वी स्कायमेटकडून मान्सूनचा वर्तवण्यात आलेला अंदाज बदलण्यात आला आहे. स्कायमेटने यापूर्वी देशात मान्सून 94 टक्क्यांपर्यंत असेल असे सांगितले होते, मात्र आता हा अंदाज बदलून 91 टक्के करण्यात आला आहे.
अलनीनोच्या प्रभावा वाढल्यामुळे हा अंदाज बदलण्यात आल्याचे स्पष्टीकरण स्कायमेटकडून देण्यात आले आहे. यामुळे देशात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा 25 टक्क्यांचा अंदाजही वाढवून 60 टक्के करण्यात आला आहे. 2009 मध्ये अलनीनोच्या प्रभावामुळे संपूर्ण देशात नेहमीपेक्षा 22 टक्के कमी पाऊस पडला होता. मात्र हवामान खात्याने आपल्या दुसर्‍या अंदाजात 94 टक्के मान्सूनची शक्यता वर्तवली आहे.
(सर्व छायाचित्र केवळ सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत)

काय आहे अलनीनो... जाणून घ्या पुढील स्लाईडवर...