आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Indian Financial Condition Good; Fitch Rating Agency Pridiction

यंदा भारताची आर्थिक स्थिती सुधारणार; फिच पतमानांकन संस्थेचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फिच या जागतिक दर्जाच्या रेटिंग एजन्सीने भारताच्या आर्थिक स्थितीबाबत पूर्वीपेक्षा चांगला दर्जा राहण्याचा अंदाज व्यक्त केला. एजन्सीने देशाचे पतमानांकन नकारात्मक (निगेटिव्ह) स्तरावरून स्थिर (स्टेबल) केले आहे. वित्तीय तुटीबाबत सरकारने उचललेल्या पावलामुळे फिचने देशाच्या दर्जात सुधारणा केली. फिचने देशाची सध्याची रेटिंग मात्र बीबीबी मायनस अशी कायम ठेवली आहे. हा गुंतवणुकीबाबतचा सर्वात खालचा दर्जा आहे.


अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे वित्तीय तूट 4.8 टक्क्यांपर्यंत राखणे सरकारला साध्य असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. एजन्सीच्या अंदाजानुसार 2014 या आर्थिक वर्षात विकासदर 5.7 टक्के तर 2015 मध्ये 6.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2013 मध्ये विकासदर 5 टक्के होता. फिच तसेच स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) या दोन्ही एजन्सींनी रेटिंग घटवून जंक ग्रेडमध्ये टाकण्याचा इशारा यापूर्वी दिला होता. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवणे तसेच गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तेव्हा सरकारकडून काहीच पावले उचलण्यात आली नव्हती. रुपयाची घसरण लक्षात घेता नजीकच्या काळात आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यता नसल्याचे फिचने म्हटले आहे.


फिचने सुचवले उपाय
पायाभूत योजनांना तत्काळ मंजुरी द्यावी, विमा व पेन्शन क्षेत्रात उदारीकरण आणावे. यामुळे गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. वीज तसेच खाण क्षेत्रातील पायाभूत सुविधांबाबतची प्रकरणे मिटवावीत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल, असे फिचला वाटते.