नवी दिल्ली - मेक्सिकोचे अब्जाधीश उद्योगपती कार्लोस स्लीम आणि ब्रिटीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅनसन यांनी जरी कर्मचार्यांच्या उत्पादनक्षमतेला लक्षात घेऊन आठवड्यातून तीनच दिवस काम करण्याचा सल्ला दिला असला, तरी भारताच्या मनुष्यबळ विकास (एचआर) क्षेत्रातील वरिष्ठांना हे मॉडेल मुळीच मान्य नाही. भारतीय वरिष्ठांच्या दृष्टीने हे मॉ़डेल भारतीय कामगारांना आणि उद्योगाला मारक आहे. विशेष म्हणजे आठवड्यातून केवळ तीनच दिवस काम या मॉडेलमुळे एचआर क्षेत्रात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
या मॉडेलअंतर्गत कामगारांनी आठवड्यातील केवळ तीन दिवस दररोज 11 तास काम करेल. मात्र त्याला इतर चार दिवसांची सुट्टी उपभोगता येईल. स्लीम हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. या मॉडेलचे समर्थन करण्यार्यांच्यामते केवळ सहा दिवसांच्या कामाच्या तुलनेत तीन दिवस कामाच्या या मॉडेलमुळे कामगारांची उत्पादन क्षमता वाढेल आणि दर्जासुध्दा चांगला राहिल.
या मॉडेलबद्दल कोण काय म्हणाले जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...
हे तर लहान अंतरासाठी वेगात धावण्यासारखे...