आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थ्री जी रोमिंगवर टीडीसॅटमध्ये फूट

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - थ्री जी इंट्रा सर्कल रोमिंग करार प्रकरणात दूरसंचार लवाद टीडीसॅटने मंगळवारी परस्परविरोधी निर्णय सुनावला. एखाद्या सर्कलमध्ये परवाना नसतानाही तेथील कंपन्यांसोबत करार करून थ्रीजी रोमिंग सेवा देण्याच्या विरोधात सरकारच्या आदेशाला रोखण्याबाबत ऑपरेटर्स याचिका टीडीसॅटच्या चेअरमन यांनी मंजूर केली. दुसरीकडे, टीडीसॅट लवादाच्या सदस्याने याला विरोध दर्शवला.
टीडीसॅटच्या द्विसदस्यीय पीठाने चेअरमन न्यायाधीश एस. बी. सिन्हा आणि सदस्य पी. के. रस्तोगी यांच्यात मतभिन्नता स्पष्ट झाली. न्यायमूर्ती सिन्हा यांनी इंट्रा सर्कल थ्रीजी रोमिंग थांबवण्याच्या सरकारी आदेश सरकारच्या नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचे उल्लंघन असल्याचे म्हणत मंजूर केली. दुसरीकडे, दूरसंचार कंपन्या रोमिंग सेवा उपलब्ध करू शकत नाहीत, असे म्हणत रस्तोगी यांन ऑपरेटर्सची याचिका फेटाळून लावली. चेअरमन सिन्हा यांच्या आकलनानुसार थ्रीजी रोमिंग करार फेटाळताना सरकारने योग्य प्रक्रियेचा अवलंब केला नाही. तसेच ऑपरेटर्सला आपले म्हणणे मांडण्याचा वेळही दिला नाही.