आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या तीन दिवसातच 'बीएसएनएल टॅब्लेट'ची बुकिंग 3 लाख

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली: भारत दूरसंचार निगम लि.ने (बीएसएनएल) नुकताच लॉन्‍च केलेल्या सगळ्यात स्वस्त टॅब्लेटला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या तीन दिवसात सुमारे तीन लाख टॅब्लेटची नोंदणी झाली आहे.
बीएसएनएलने 3,499 रुपयांपासून ते 12,500 रुपयांपर्यंत किंमतीचे तीन टॅब्लेट बाजारात आणले आहे. पेन्‍टेल टेक्नॉलॉजीच्या सहयोगाने नोकियाद्वारा या टॅब्लेटची निर्मिती केली करण्‍यात आली आहे. प्री बुकिंग झालेल्या टॅब्लेटची डिलीव्हरी पाच मार्चनंतर सुरू होणार आहे. तर रीटेल स्‍टोअर्स आणि बीएसएनएल आउटलेट्समध्ये येत्या एक मार्चपासून ते उपलब्‍ध केले जाणार आहे. आतापर्यंत एक लाख ग्राहाकांनी दूरध्वनि अथवा ऑनलाईन प्री बुकिंग केली आहे तर सहारा इंडियांनी दोन लाख टॅब्लेटची नोंदणी केली आहे, अशी माहिती पेन्‍टेल टेक्टलॉलीचे संचालक वीरेंद्र सिंग यांनी दिली आहे. कॉर्पोरेट जगतातून देखील या टॅब्लेटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डेटाविंड कंपनीचा 'आकाश' टॅब्लेटला बीएसएनएलचा टॅब्लेट टक्कर देईल, असे बोलले जात आहे.
'आकाश'ला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलचे तीन टॅब्‍लेट!