आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन नव्या कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मर्सिडीझ, ऑडी व बीएमडब्ल्यूच्या सर्वात चर्चित कॉम्पॅक्ट लक्झरी एसयूव्ही सेगमेंट मॉडेलविषयी ... या तिन्ही कार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मर्सिडीझमध्ये केबिन क्वालिटी चांगली आहे. ऑडीमध्ये एसयूव्ही फील मिळतो. बीएमडब्ल्यूचे पंची इंजिन आणि शार्प हँडलिंग कारप्रेमींना आकर्षित करत आहे, मात्र याची लो-सीटिंग पोझिशन ग्राहकांना पसंत पडणार नाही. ३५ ते ३७ लाखांदरम्यानचे हे तीन सर्वोत्कृष्ट मॉडेल्स आहेत.

मर्सिडीझ-बेंझ जीएमए २०० सीडीआय
मर्सिडीझच्या नव्या मॉडेलला स्ट्रायकिंग लुक्स आणि हाय-फाय केबिन क्वालिटीमुळे पसंती मिळत आहे. इतर दोन मॉडेल्सच्या तुलनेत याची रायडिंग क्वालिटी तितकीशी सरस नाही. कारमध्ये चांगली स्पेस आहे. मात्र, खिडक्या छोट्या असल्यामुळे स्पेस टाइट वाटते. सीट स्क्वॅब खूप छोटे आहेत.
किंमत ३६.२ लाख

फीचर्स
- इंजिन: ४ सिलिंडर, २१४३ सीसी
- १०० केपीएच: ९.५१ सेकंद
- टॉप स्पीड: २०५ केपीएच
- रुंदी : १८०४ एमएम
- पॉवर : १३४ बीएचपी अॅट ३६००-४००० आरपीएम
- फ्युएल टँक : ५० लिटर
- बूट स्पेस : ४२१ लिटर
- टाइप : फ्रंट-व्हील ड्राइव्ह

डॅशबोर्ड/इंटेरिअर
जीएलएची केबिन खूप स्पोर्टियर आहे. याची बनावट उत्तम व मटेरियल दर्जेदार आहे. इंटेरिअर सुंदर असून कारमध्ये बसताच स्पेशल फील येतो. कार अप-टू-डेट आहे.