नोकियाच्‍या या मोबाइलमध्‍ये / नोकियाच्‍या या मोबाइलमध्‍ये आहेत तीन स्क्रीन

दिव्‍यमराठी वेब टीम

May 12,2012 12:20:51 PM IST

नोकियाच्या या फोनबाबतीत काही माहिती बाहेर फुटली असून कंपनी मोबाइलमध्ये काही उत्कृष्ट सुविधा देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोबाइलमध्ये स्वाइप जेस्चर असेल. त्यामध्ये तीन होमस्क्रीन असणार आहेत.

नोकिया एस-40 च्या पहिल्या स्क्रीनवर अँप्लिकेशन्स असणार आहेत. दुसर्‍यावर शार्टकट्स, तर तिसर्‍यावर सतत वापरले जाणारे अँप्लिकेशन्स असतील. हे पाहून नोकिया एन-9 ची आठवण येते. यामध्ये अशाच प्रकारच्या सुविधा होत्या. मोबाइलच्या स्क्रीनवर डावी किंवा उजवीकडे स्वाइप करून बघितले असता स्क्रीन आपोआप बदलली जाते. जर तुम्ही स्क्रीन खाली-वर स्वाइप केली, तर मिस्ड, डायल्ड आणि रिसिव्हड कॉल्सची सविस्तर माहिती मिळते.
नोकियाच्या सर्व सुविधा विशेषकरून स्मार्टफोनवर असतात; परंतु या मोबाइलसंबंधी सर्व माहिती तो बाजारात आल्यावरच मिळू शकेल.

X
COMMENT