आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi Ban On Realty Giant Company Dlf For Three Years

सेबीने रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफवर तीन वर्षांसाठी घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेबीने रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफ तसेच कंपनीचे चेअरमन के. पी. सिंह यांच्यासह सहा उच्चाधिका-यांवर शेअर बाजारात तीन वर्षांपर्यंत व्यापार करण्यावर बंदी लादली आहे.डीएलएफने २००७ मध्ये आणलेल्या आयपीओमध्ये महत्त्वाची माहिती लपवल्याबद्दल सेबीने ही कारवाई केली आहे. डीएलएफने या आयपीओच्या माध्यमातून ९,१७८ कोटी रुपये उभारले होते.
सेबीचे सदस्य राजीव अग्रवाल यांनी सांगितले की, नियमांच्या उल्लंघनामुळे शेअर बाजाराची सुरक्षितता धोक्यात येऊ शकत होती.
डीएलएफ व कंपनीचे उच्चाधिकारी आयपीओच्या घोषणांमध्ये गैरव्यवहार व अयोग्य व्यवसायविरोधी कायद्याच्या उल्लंघनाचे दोषी आढळले.

तलवार यांना संशयाचा फायदा
आयपीओचे दस्तऐवज जमा करताना के.पी. सिंह व त्यांच्या मुला-मुलीसह सर्वच उच्चपदस्थ व्यवस्थापनाचे भाग होते. तत्कालीन नॉन-एक्झक्युटिव्ह जी.एस. तलवार यांना सेबीने "संशयाचा फायदा' दिला आहे. तलवार कंपनीच्या दैनंदिन कामाचा भाग होते, हे सिद्ध न झाल्याचे सेबीने सांगितले. दैनंदिन कामातील सहभाग सिद्ध न झाल्यामुळे संशयाचा फायदा तलवार यांना मिळाला आहे.

काय होणार परिणाम
पुढील तीन वर्षांपर्यंत डीएलएफला शेअर बाजारातून भांडवल उभारता येणार नाही. बंदी असलेल्यांनाही तीन वर्षे शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री करता येणार नाही.

यांच्यावर बंदी
डीएलएफ, चेअरमन के.पी. सिंह, त्यांचा मुलगा राजीव सिंह (व्हाइस चेअरमन), मुलगी पिया सिंह (पूर्णवेळ संचालक), टी.सी. गोयल (एमडी), कामेश्वर स्वरूप आणि रमेश सांन्का.

काय आहेत आरोप
> एप्रिल २००७ मध्ये डीएलएफची कंपनी सुदीप्ती इस्टेट्स व के.पी. सिंह यांचे पुतणे प्रवीणकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. जमिनीच्या सौद्यात ३४ कोटींच्या फसवणुकीचा आरोप. डीएलएफने आयपीओच्या अर्जात ही माहिती लपवली.
> यानंतर खोट्या सौद्यांद्वारे डीएलएफने सुदीप्ती इस्टेट्सला समूहाबाहेरची कंपनी म्हणून दाखवले. तथापि व्यवस्थापनात कोणताही बदल करण्यात आल नव्हता.