आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Through Modern Sale Techniqu Business Extend Yours Global Chance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधुनिक विक्रीतंत्राद्वारे व्यवसाय विस्ताराची जागतिक संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रसार माध्यमांमधून उत्पादनांच्या जाहिरातींसाठी विविध क्षेत्रांतील राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय कंपन्यापासून शैक्षणिक आर्थिक संस्था, लघु उद्योगजक आपल्या सेवा आणि उत्पादनांच्या आकर्षक जाहिराती प्रसारित करतात. या जाहिरातींचा मूळ उद्देश संभाव्य ग्राहकांचा शोध घेऊन विक्री, संपर्क वाढवणे हाच असतो. न्यूरो मार्केटिंग ही आधुनिक संकल्पना असून, ग्राहकांच्या जाहिरातीकडे बघण्याच्या मानसिकतेपासून त्या ग्राहकाच्या प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवा करण्यापर्यंतचा विचार व निर्णय होत असताना, ग्राहकांच्या मेंदूमध्ये घडणा-या सूक्ष्म तरंग बदलांचा fmr (functional magnetic resonance imaging ) व U e (ele ctroencephalogram) या तंत्रज्ञानाद्वारे केला जातो. संभाव्य ग्राहक आपली सेवा किंवा उत्पादन निवडताना कसा विचार करतो, त्यानुसारच आपली जाहिरात किंवा सेवा प्रणालीची व्यूहरचना प्रभावीपणे करणे फायद्याचे ठरते.


न्यूरोलॉजी हे शास्त्र मानवी मेंदूची रचना, स्वरूप व कार्य
हयाचा अभ्यास व संशोधन क्षेत्र

न्यूरोलॉजी हे शास्त्र मानवी मेंदूची रचना, स्वरूप व कार्य हयाचा अभ्यास व संशोधन क्षेत्र आहे, परंतु आता हे शास्त्र मार्केटिंग क्षेत्रात आपले स्थान सिद्ध करत आहे. न्यूरो मार्केटिंग तंत्राद्वारे ग्राहकांच्या खरेदीचा कल व निर्णय आपल्याच उत्पादन व सेवेकडे व्हावा, त्यासाठी पूर्वीप्रमाणे ग्राहकांच्या फक्त मानसिकतेचा अभ्यास न करता, पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. ग्राहक जेव्हा आपले उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या मेंदूवर कोणत्या सूक्ष्म तरंगांचा परिणाम होतो, हयाचा अभ्यास करूनच त्या उत्पादनाची जाहिरात, पॅकेजिंग, लेबल व इतर प्रचार साहित्य निर्माण केले जाते.


आधुनिक युगात सर्वच व्यापार क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने
क्रांतिकारी बदल घडवून आणले

न्यूरो मार्केटिंग तंत्र सध्या त्याच्या नवजात अवस्थेत आहे. या शास्त्राचा मार्केटिंग क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आलेला आहे. संशोधकांनी हे शास्त्र फार प्रभावी असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. आपण भारतीय बाजारपेठ उद्योगक्षेत्राचा विचार केल्यास, न्यूरो मार्केटिंग तंत्राच्या फक्त प्राथमिक सिद्धांतांचा वापर केल्यास विक्री वृद्धी व उद्योग विस्तार करण्यात बराच फायदा होतो. आधुनिक युगात सर्वच व्यापार क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाने क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. पारंपरिक व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसाय वृद्धीला वेळ, काळ, स्थळ, गरजा, आर्थिक अशा विविध मर्यादा होत्या. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे संपूर्ण जगात विविध प्रकारच्या नव्या बाजारपेठा निर्माण होऊ लागल्या. उद्योग-व्यापाराच्या विस्तारासाठी कोणीही आपले उत्पादन जगातील कोणत्याही प्रांतात उपलब्ध करून व्यवसाय विस्तार करू शकतो. माध्यमांचा एकत्रित उपयोग करण्यासाठी विविध कंपन्या व सेवा पुरवठादारांसाठी स्पर्धा व स्पर्धेमुळे सर्व सामान्यांच्या आवाक्यातल्या किमती, हया सर्व बाजारपेठेतील परिवर्तनामुळे आजचा ग्राहक जो पूर्वी ‘ग्राहकराजा’ होता तो आता ‘ग्राहकसम्राट’ झाला आहे.


पारंपरिक मार्केटिंगचे फंडे
पारंपरिक मार्केटिंगचे फंडे आता ग्राहकांच्या परिचयाचे झाले आहेत. रोज कोणत्या ना कोणत्या ऑफर, स्किम, डिस्काउंट हे नेहमीचे झाले आहेत. पूर्वी कोणतीही वस्तू खरेदी करण्याची ठराविक वेळ किंवा सण असायचा. फक्त सणासुदीलाच वस्त्र, उपकरणे, गाडी, दागिने खरेदी करणारा ग्राहक आता फार कमी प्रमाणात आढळतो. मनात येईल तेव्हा, सहज म्हणून कोणतेही कारण नसताना, आर्थिक परिस्थिती असताना किंवा नसताना, खरेदी करणारे ग्राहक आपल्याला दिसतात.


आधुनिक मार्केटिंग शास्त्रामध्ये ब्रँडिंगवर प्रचंड प्रमाणात संशोधन
आधुनिक ग्राहक गरजांच्या बाबतीत फार चोखंदळ झाला आहे. पूर्वी एका ब्रॅँडचे साबण अंगासाठी व एका ब्रॅँडचे कपड्यांसाठी खरेदी करीत असत, परंतु आता कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा ब्रॅँड तसेच वेगवेगळ्या कपड्याच्या प्रकारासाठी वेगळे ब्रॅँड, तसेच हात धुण्यासाठी वॉश बेसिन, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, अशा विविध प्रकारे ग्राहकांचे मासिक बजेट वाढवतात. हेच विविध खाद्यपदार्थ व इतर उत्पादनांसाठी लागू होते. या स्पर्धात्मक वातावरणात अमुक वस्तू, अमुक ब्रॅँडची वस्तू, अमुक व्यक्तीसाठी हवी असते. आधुनिक मार्केटिंग शास्त्रामध्ये ब्रॅँडिंगवर प्रचंड प्रमाणात संशोधन झाले आहे. ब्रॅँडिंगसाठी राष्‍ट्रीय व बहुराष्‍ट्रीय कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करतात.आपल्यावर ब्रॅँडिंगच्या जाहिरातीचा प्रचंड मारा करतात. ब्रॅँडिंगसाठी जाहिरात क्षेत्र हे नवीन कल्पक स्थान व वेळ साधत असते. सर्व स्थरातील सर्व वयोगटातील, सर्व उत्पन्न गटातील, ग्राहकांना आपल्या ब्रॅँडकडे आकर्षित करण्याचा खटाटोप व क्लृप्त्या विविध कंपन्या करत असतात. ग्राहकांचे मन जिंकण्यासाठी उत्पादक व्यूहरचना करत असतो व आपला ब्रॅँड व्यवसायाचा विस्तार करत असतो.


उत्पादनात हवे ते बदल करून उत्पादन बाजारात आणले जाते
आता न्यूरो मार्केटिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जागतिक बाजारपेठेत सुरू झाला आहे. उत्पादनांचा रंग, चव, प्रकार, आकार अशा विविध प्रकारच्या आवडी-निवडीद्वारे वस्तू खरेदीचा निर्णय ग्राहक करत असतो. ही खरेदीची निर्णय प्रक्रिया ग्राहकांच्या मेंदूत होत असताना व ग्राहकाने जेव्हा ते उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेतो. त्या क्षणी त्या ग्राहकाच्या मेंदूतील विविध प्रकारच्या ऊर्जा बदलांचा अतिशय सूक्ष्म, शास्त्रशुद्ध संशोधन व अभ्यास करून, उत्पादनात हवे ते बदल करून उत्पादन बाजारात आणले जाते. कोणत्या प्रकारच्या, कोणत्या प्रांतातल्या, कोणत्या आर्थिक वर्गातील ग्राहकांना कोणता आकार, रंग, किंमत, प्रकार, जास्त प्रेरित करतो, याचा अभ्यास करून तसे उत्पादन बाजारात आणले जाते. न्यूरो मार्केटिंगमध्ये fnri आणि eeg या अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून, त्याच प्रकारे जाहिरात, पॅकेजिंग व माहिती पत्रकांची रचना केली जाते. ग्राहकांच्या मेंदूतील निर्णय क्षमतेचा सूक्ष्म अभ्यासाअंती हे उत्पादन बाजारात आल्यामुळे सर्व सामान्य ग्राहक नकळतच त्या उत्पादनाकडे आकर्षित होईल, हे या आधुनिक तंत्रज्ञानाचे गमक आहे. थोडक्यात बाजारपेठेमधील ग्राहकांच्या मेंदूच्या निर्णय क्षमतेचाही ताबा घेईल.
भारतीयामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारी प्रचंड बौद्धिक संपन्नता व कल्पनेच्या जोरावर उभारलेल्या सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, शिक्षणक्षेत्र, आरोग्यसेवा, अग्रीकल्चर, अ‍ॅटोमोबाइल्स आदी, अशा क्षेत्रांनी जर न्यूरो मार्केडिंग तंत्राच्या आधारे आपली व्यवसायाची मार्केटिंग व्यूहरचना केली तर स्थानिक व जागतिक बाजारपेठेतील भारतीयांचे स्थान बरेच अग्रेसर ठरेल.


(लेखक हे लक्ष्य कॉन्सेप्टस मुंबई येथे तज्ज्ञ व्यवसाय सल्लागार व न्यूरो मार्केटिंग प्रशिक्षक आहेत.)
lakshaconcepts@rediffmail.com