आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 10 रुपयात सिंगापूर; टायगर एअरलाईन्सची आगळीवेगळी ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विमान कंपन्यांमध्ये तिकीटांच्या दराबद्दल सध्या चांगलीच स्पर्धा सुरू आहे. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या एकापेक्षा एक ऑफर आणत आहेत. स्पाईसजेट, इंडियन एअरलाईन्स, एअर इंडिया नंतर सिंगापूर एअरलाईन्सही या स्पर्धेत उतरली आहे. सिंगापूर एअरलाईन्सने तर केवळ 10 रुपयांमध्ये सिंगापूर दर्शनची ऑफर दिली आहे. मात्र यामध्ये टॅक्सची रक्कम गृहित धरण्यात आलेली नाही, जी प्रवास्याला वेगळी द्यावी लागणार आहे. टायगर एअरची ही ऑफर कंपनीला 10 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल देण्यात आली आहे.
केव्हा घेता येईल या ऑफरचा लाभ
टायगर एअरकडून दिल्या जाणार्‍या या ऑफरअंतर्गत 21 सप्टेंबर 2014 पर्यंत तिकीट बुक करावे लागेल. यानंतर 12 जानेवारी 2015 ते 31 मार्च 2015 आणि 21 जुलै 2015 ते 22 सप्टेंबर 2015 दरम्यान तिकीट बुक करता येईल.
तिकीट बुक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.. Click Here