सोशल नेटवर्किंगवर मित्रांच्या लग्नाचे फोटो पाहून आपल्याही मनात लग्न करण्याची इच्छा निर्माण होते.
फेसबुकवर इतरांच्या लग्नाचे फोटो पाहून तुम्हाला त्यांच्याविषयी कधी कधी मत्सर(राग) तयार होतो. व्हेंलेंटाइन डे अवघ्या एका दिवसावर आला असताना तुम्हालाही एकटे राहणे कठीण आहे. तुमचा हाच एकटेपणा कमी करण्यासाठी आम्ही आज एक खास अॅप घेऊन आलो आहोत. हे एक 'टाइम अॅप' आहे. फेसबुकच्या फीडवरून, युजर आणि त्याच्या फेसबुक आपडेटच्या मदतीने हे अॅप युजरचे लग्न कधी होईल ते सांगते.
हे अॅप कसे काम करते
टाइम अॅपची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तुमच्या फेसबुक फ्रेंडच्या लग्न करण्याचे सरासरी वय काढून तुमच्यापेक्षा जास्त आणि कमी वय असणा-या फ्रेंडसची हे अॅप एक यादी तयार करते. याच्यावरून तुमचे आणि तुमच्या मित्रांचे लग्न कधी होणार, हे अॅप सांगते. जे लोक त्यांचे रिलेशन स्टेट्स अपडेट करत नाही त्यांचा हे अॅप यादीत समावेश करत नाही.