आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केवळ सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान करता येईल ऑनलाइन फंड ट्रान्सफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस प्रणालीअंतर्गत व्यवहारीक तास वाढवण्याच्या संदर्भात सर्कुलर जारी केले आहे. त्यामुळे आता ऑनलाइन फंड ट्रान्सफर आठवड्याच्या कामाच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत करता येईल. शनिवारी ही सुविधा सकाळी 8 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मिळेल. नवीन नियम 29 डिसेंबरपासून लागू होणार आहे. आरबीआयचा या निर्णयामागील उद्देश इलेक्ट्रॉनिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा आहे.

सध्याची प्रणाली
सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वातेपासून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन फंड ट्रान्सफरची सुविधा मिळते.

आरटीजीएस म्हणजे काय?
रिझर्व्ह बँकेने ग्राकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रोख रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी ऑक्टोबर 2013 मध्ये आरटीजीएस म्हणजेच रिअल टाइम ग्रास सेटलमेंट प्रणाली सुरू केली होती. या चॅनलद्वारे ऑलाईन रक्कम ट्रान्सफर करण्याची किमान सीमा दोन लाख रुपये आहे. दोन लाखापेक्षा कमी रक्कम एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) द्वारे ऑनलाइन ट्रान्सफर केली जाऊ शकते.