आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकर्‍यांच्या प्रमाणात मार्चमध्ये 3% वाढ : टाइम्स जॉबचा सर्व्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांमध्ये नोकरी बाजारपेठ काहीशी थंडावली होती; परंतु आता या बाजारपेठेत काहीसा जोर आला असून मार्च महिन्यात नवीन नोकर्‍यांचे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढले असल्याचे ‘टाइम्स जॉब डॉट कॉम रिक्रुइटेक्स’ या अहवालात म्हटले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात नवीन नोकर्‍या देण्याबाबत फारशा काही घडामोडी घडलेल्या नसल्या तरी मार्चमध्ये नवीन नोकर्‍यांच्या निर्देशांकात वाढ होऊन तो 90 टक्क्यांवरून (फेब्रुवारी) 93 टक्क्यांवर (मार्च) गेला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीय कंपन्या भविष्याबाबत आशावादी असल्याचे यातून दिसत आहे.