आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RESEARCH TIPS: मोबाईलची बॅटरी कधीही 100 टक्‍के चार्ज करु नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोनमुळे लाईफ स्‍टाईलमध्‍ये बदल झाले आहेत. स्‍मार्टफोनवरच इंटरनेट आणि गेम्‍सचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. याशिवाय स्‍मार्टफोनमध्‍ये अनेक अप्लिकेशन्‍स असतात. त्‍यातच स्‍क्रीनही मोठी असते. या सर्वांचा एकूणच बॅटरीवर परिणाम होतो. जेवढा जास्‍त वापर, तेवढीच लवकर बॅटरीही डिस्‍चार्ज होते. त्‍यामुळे स्‍मार्टफोनची बॅटरी दिर्घकाळ टिकण्‍यासाठी तसेच जास्‍त वेळ चार्ज राहण्‍यासाठी बरेच संशोधन झाले आहे. त्‍यावरुन काही सल्‍ले देण्‍यात आले आहेत. बॅटरी पूर्णपणे डिस्‍चार्ज झाली असो किंवा नसो, अनेक जण दररोज फोन चार्ज करतात. तर काही जण पूर्ण डिस्‍चार्ज होईपर्यंत वाट बघतात. परंतु, तज्‍ज्ञांनी एक ठोस निष्‍कर्ष काढला आहे. बॅटरी दिर्घकाळ चार्ज रहावी, यासाठी कधीही 100 टक्‍के चार्ज करु नये, असे तज्‍ज्ञांनी सांगितले आहे.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या बॅटरी दिर्घकाळ टिकविण्‍याच्‍या टीप्‍स...