आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्बनचा टायटेनियम एस-9 स्‍मार्टफोन लॉंच, गॅलेक्सी नोट-2 ला देणार टक्‍कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोनच्‍या क्षेत्रात सध्‍या जबरदस्‍त प्राईसवॉर दिसत आहे. भारतात स्‍मार्टफोनची मोठी बाजारपेठ आहे. त्‍यामुळे सर्वच कंपन्‍या भारताकडे लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. जवळपास रोज एक नवा स्‍मार्टफोन भारतात लॉंच होताना दिसून येत आहे. त्‍यावरुनच या स्‍पर्धेची कल्‍पना येऊ शकते.

सध्‍या स्‍मार्टफोनच्‍या बाजारपेठेत सॅमसंगने मोठा हिस्‍सा काबीज केला आहे. सॅमसंगला टक्‍कर देण्‍यासाठी काही देशी कंपन्‍या कमी किंमतीमध्‍ये भरपूर फिचर्स असलेले हॅण्‍डसेट सादर करत आहेत. कार्बन या कंपनीने एक नवा फोन लॉंच केला. हा फोन सॅमसंगच्‍या 'गॅलेक्सी नोट-2' या स्‍मार्टफोनला टक्‍कर देऊ शकेल. कार्बनच्‍या या फोनचे नाव आहे 'टायटेनियम एस-9'. हा फोन अतिशय स्‍टायलिश आहेच. परंतु, 'गॅलेक्सी नोट-2' मध्‍ये असलेले सर्व फिचर्स या स्‍मार्टफोनमध्‍ये उपलब्‍ध आहेत, तेही अर्ध्‍या किंमतीमध्‍ये.

टायटेनियम एस-9 स्‍मार्टफोनची वैशिष्‍ट्ये जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...