आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराचा कल पाहून करा शेअर्सची खरेदी-विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात अपेक्षेनुसार शेअर बाजारात प्रारंभीच्या घसरणीनंतर तेजी दिसून आली. समभागांच्या किमती खालच्या पातळीवर गेल्याने त्यात खरेदी दिसून आली. गेल्या आठवड्यात निफ्टी 5556 या स्तराखाली जाणार नाही असे मी म्हटले होते. दरम्यान, निफ्टी 5556 च्या खाली आला परंतु नंतर निर्देशांकाने 5904 ही पातळी गाठली.


या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदार विक्रीदाराच्या रूपात होते, शुक्रवारी मात्र त्यांनी खरेदीदाराची भूमिका वठवली. विदेशी गुंतवणूकदारांनी 13 दिवसांच्या विक्रीचा धडाका थांबवत शुक्रवारी 11.24 अब्ज रुपयांच्या (18.91 कोटी डॉलर) समभागांची खरेदी केली. तसेच फ्युचर निर्देशांकाअंतर्गत त्यांनी 16.91 अब्ज रुपयांच्या (28.45 कोटी डॉलर) शेअर्सची खरेदी केली. बाजाराच्या तेजीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, नीचांकी पातळीवरून रुपया सुधारणे आणि चालू खात्यातील वित्तीय तूट कमी होणे यांचाही मोठा वाटा राहिला. चालू खात्यातील तूट अपेक्षेएवढी फुगली नसल्याचा फायदा झाला. या तेजीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विदेशी गुंतवणूकदारांचा फारसा सहभाग नव्हता.


एप्रिल ते मे या काळात देशाची वित्तीय तूट 1.8 लाख कोटी रुपये (30.4 अब्ज डॉलर) एवढी राहिली. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय लक्ष्यानुसार ही तूट 33.3 टक्के राहिली. आगामी कालासाठी ही तूट गुंतवणूकदारांच्या काळजीचा विषय राहील. शुक्रवारी बाजारात तेजीचा जोर एवढा होता की, या तुटीकडे बाजाराने चक्क दुर्लक्ष केले. वाहनांच्या विक्रीची आकडेवारी समाधानकारक राहिली तर एचएसबीसी मार्केट पीएमआयच्या आकडेवारीने किंचित वाढ नोंदवली. त्यामुळे याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही आणि शेअर बाजारातील तेजीला ही आकडेवारी फारसे बळ देऊ शकली नाही. या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करत बाजारात तेजी आली आहे, त्यामुळे आता व्यावहारिक दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. बाजारातील वातावरण अद्याप सकारात्मक आहे. मात्र, चार्टवर नजर टाकल्यास काही प्रमाणात कन्सोलिडेशन तसेच नफेखोरीचे संकेत मिळताहेत. बुधवारी काही प्रमाणात नफेखोरी दिसली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
निफ्टीबाबत सांगायचे झाले तर खालच्या दिशेने निफ्टीला 5831 वर पहिला आधार मिळेल. हा एक हलका आणि चांगला आधार आहे. या पातळीवर निफ्टी स्थिर आणि कन्सोलिडेट होण्याची शक्यता आहे. मात्र, निफ्टीने ही पातळी सोडल्यास 5795 वर निफ्टीला पुढचा आधार आहे. हा आधार फारसा मजबूत नाही. मात्र, 5756 पातळीवर निफ्टीला तगडा आधार आहे. सर्वसाधारण स्थितीत हा आधार कायम राहील.


वरच्या दिशेच्या विचार केल्यास निफ्टीला 5868 वर पहिला अडथळा होईल. हा हलका अडथळा आहे. निफ्टीने हा अडथळा पार केल्यास तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. निफ्टीला पुढील अडथळा 5894 वर होईल. त्यानंतर निफ्टीला 5972 पातळीवर तगडा अडथळा आहे.


शेअर्सबाबतीत सांगायचे झाले, तर या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडस इंड बँक लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. एम अँड एम चा मागील बंद भाव 978.90 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 996 रुपये आहे, तर स्टॉप लॉस 959 रुपये आहे. टायटन इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 232.05 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 239 रुपये, तर स्टॉप लॉस 223 रुपये आहे.इंडस इंड बँकेचा बंद भाव 476.45 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 489 रुपये आणि स्टॉप लॉस 462 रुपये आहे.


लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.comचे सीईओ आहेत.