आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्‍याची आज अंतिम तारीख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लेखा तपासणी करण्याची गरज नसलेल्या पगारदार, वैयक्तिक आणि नॉन कॉर्पोरेट करदात्यांना 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा एकूण उत्पन्न कमी असणा-या व्यक्ती हाताने किंवा ई-फायलिंगद्वारे आपले विवरणपत्र दाखल करू शकतात; परंतु पाच लाख रुपयांपेक्षा जास्त एकूण उत्पन्न असलेल्या व्यक्तींना विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. अल्प किमतीत विवरणपत्र तयार करून दाखल करण्यासाठी करदाते प्राप्तिकर विभागाने प्रमाणित केलेल्या टॅक्स रिटर्न प्रिपेअर्स (टीआरपीएस) ची मदत घेऊ शकतात.


असे भरा ई - विवरणपत्र
० प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जाऊन योग्य तो आयटीआर फॉर्म निवडून विवरणपत्र दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे.
० विवरणपत्र ऑफलाइन तयार करून सोप्या प्रक्रियेनंतर ते अपलोड करता येते.
० डिजिटल स्वाक्षरी असल्यास योग्य प्रकारे विवरणपत्र अपलोड केल्यानंतर त्याची छापील पोचपावतीही घेता येते.
० मात्र, डिजिटल स्वाक्षरी नसल्यास करदात्याला आयटीआय-5 फॉर्मची छापील प्रत घेऊन त्यावर सही करून ती स्पीडपोस्ट अथवा टपालाद्वारे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पीसीसी, पोस्ट बॉक्स नं. 1, इलेक्ट्रॉनिक सिटी, पोस्ट ऑफिस बंगळुरू-560100 कर्नाटक या पत्त्यावर प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून 120 दिवसांच्या आत पाठवणे गरजेचे.