आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप 100 मध्ये 12 भारतीय कंपन्या; सर्वोत्तम कंपन्यांची यादी जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आऊटसोर्सिंग क्षेत्रात भारतीय कंपन्यांचे स्थान बळकट होऊ लागलेले आहे. इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ आऊटसोर्सिंग प्रोफेशनल्स (आयएओपी) या संस्थेने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील 100 अव्वल जागतिक आऊटसोर्सिंग कंपन्यांमध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, विप्रोसह तब्बल 12 भारतीय आऊटसोर्सिंग कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी फक्त दोनच भारतीय कंपन्या या यादीत होत्या.
आयएओपीच्या या यादीत तीन भारतीय कंपन्यांनी तर पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीत स्थान पटकावले असून अ‍ॅसेंचर सर्वात अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी या यादीत इन्फोसिस चौथ्या स्थानावर होती. परंतु यंदा कंपनीला दुसरे स्थान पटकावण्यात यश आले आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीजने तर गेल्या वर्षीच्या 20 व्या स्थानावरून एकदम तिसºया स्थानावर तर विप्रोने 9 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर
झेप घेतली आहे.
अन्य भारतीय कंपन्यांमध्ये आयगेट पटणी (18), फर्स्टसोर्स (22), डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस (26), झेन्सार टेक्नॉलॉजीज (53), हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज (55), इन्फोटेक एन्टरप्राईझेस (56) या कंपन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय एनआयआयटी टेक्नालॉजीज (65), आदित्य बिर्ला मिनाक्स (66), आयटीसी इन्फोटेक (70), बिर्लासॉफ्ट (72) या कंपन्या देखील यादीत आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांची सरासरी 1.6 अब्ज डॉलर्सची वार्षिक विक्री आहे. त्याचबरोबर जगभरात या कंपन्यांचे सरासरी 17,400 कर्मचारी कार्यरत आहेत.
गेल्या वर्षी इन्फोसिस आणि विप्रो या दोनच भारतीय कंपन्यांचा ‘टॉप 100’ कंपन्यांच्या यादीत समावेश होता. अव्वल 100 कंपन्यांच्या 2011 वर्षाच्या यादीत फर्स्टसोर्स, झेन्सार टेक्नॉलॉजीज, आयगेट ग्लाबेल सोल्युशन्स, मास्टेक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स या देखील काही कंपन्यांचा समावेश आहे.