आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त झाले Smartphone; मागील दोन महिन्यात चक्क हजार ते १० हजारांनी कमी झाल्या किमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(LG L90 Dual)
गॅजेट डेस्क - लोकप्रिय स्मार्टफोन्स कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती कमी करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला अॅपल आणि सॅमसंगने त्यांच्या फोनच्या किंमती कमी केल्या होत्या. मात्र आता या यादीमध्ये जगप्रसिध्द कंपनी LG चे नावही समाविष्ट झाले आहे. नुकतेच सॅमसंग, सोनी, मोटोरोला, अॅपल या कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलच्या किंमती १००० ते १५००० पर्यंत कमी केल्या होत्या. मुंबई येथील रिटेल व्यापारी मनिष खत्री (@maheshtelecom) यांनी ट्वीट करून LG L90 आणि L80 यांच्या किंमती कमी झाल्याचे सांगितले आहे. यामध्ये L90 ची किंमत 13499 रुपये आणि L80 यांची किंमत 11999 रुपये एवढी करण्यात आली आहे.
LG ने हा फोन सुरूवातील 17500 रुपयांत तर (L90) 19000 रुपयात लॉन्च केला होता. विशेष म्हणजे काही इकॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर L80- 11899 रुपये आणि L90 डुअल 13489 रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी ठेवले आहेत. मात्र अजूनही LG तर्फे या दरकपातीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही या दर कपातीला जवळपास खरेच मानले जात आहे.
मागील काही दिवसात लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किंमतीमध्ये मोठी कपात झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त फोन हे सॅमसंगचे आहेत. Divyamarathi.com तुम्हाला मागील दोन महिन्यात कमी किंमत झालेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, कोणकोणत्या स्मार्टफोन्सची किती हजारांनी किंमत कमी झाली -