आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किटकॅटपेक्षा आधुनिक आहे Android L 5.0 ऑपरेटिंग सिस्टम, जाणून घ्या 8 सुपर फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अँड्रॉईड L ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे डिव्हाईस )
गॅजेट डेस्क - गुगलचा GOSF 2014 (ग्रेट इंडिया शॉपिंग फेस्टिवल) धमाक्यात सुरू झाला आहे. या शॉपिंग फेस्टमध्ये भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या 400 पेक्षा जास्त ई-कॉमर्स वेबसाइट्सने भाग घेतला आहे. यावर युजर्सला चांगला डिस्काऊंट मिळत आहे. GOSF सोबत गुगल आणि HTC ने बनवलेला नेक्सस 9 टॅबलेटसुध्दा आता भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

अँड्रॉइड लॉलीपॉपवर काम करणारे पहिले डिव्हाईस
नेक्सस 9 भारतीय मार्केटमधील पहिला असा डिव्हाईस आहे ज्यामध्ये अँड्रॉइड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. अँड्रॉइड 5.0 L ऑपरेटिंग सिस्टममध्ये सर्वात विशेष आहे ते म्हणजे याचे नवीन लुक. या लुकला कंपनीने 'मटेरियल डिजाइन'चे नाव दिले आहे. यामध्ये गुगल प्लेच्या बेसिक सर्व्हिसेसपासून ते अॅप, होम विंडो आणि नोटीफिकेशन स्क्रीन असे सर्वच बदलण्यात आले आहे. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे अँड्रॉईड L च्या फीचर्सबद्दल

फेस अनलॉक-
नव्या अँड्रॉईड L ऑपरेटिंग सिस्टममध्ये फेस अनलॉकचे फीचर देण्यात आले आहे. बघायला गेल तर हे थोडे जादूसाखेच वाटते की ऑपरेटींग सिस्टीम तुमचा चेहरा ओळखून घेईल. theverge.com नुसार अँड्रॉईड L चे हे फीचर खुपच स्लो आहे आणि चेहरा ओळखण्यासाठी चांगल्या प्रकाशाची आवश्यकता असते. सोबतच जेवढा वेळ हे फीचर चालू होण्यास लागतो, तेवढ्या वेळात तर युजर फोन हाताने अनलॉक करून घेईल.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, इतर फीचर्सबद्दल -