आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनमध्ये करा PHOTO EDIT, जाणून घ्या नऊ बेस्ट कॅमेरा अॅप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो एडिटिंगची अनेकांना आवड असते. फोटो एडिटिंगसाठी कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपची मदत घेतली जाते. परंतु आताचा जमाना हा स्मार्टफोनचा आहे. त्यामुळे कॉम्प्युटरवर फोटो एडिटिंग करणे अनेकांना कंटाळवाने वाटते. विशेष म्हणजे स्मार्टफोनवरच फोटो एडिटिंग करणे आता सहज शक्य झाले आहे.
स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येक युजर्स कॅमेर्‍याकडे खास लक्ष देतो. फोन कुठल्याही कंपनीचा असो त्यात पॉवरफुल कॅमेरा असला म्हणजे तुमचे पैसे वसूल झाले असे समजा. आता बहुतांश फोनद्वारे फोटो क्लिक केल्यानंतर त्यात एडिट करण्याचीही सुविधा उपलब्ध असते. काही फोनमध्ये फोटो एडिटींग अॅप्स प्री-इंस्टॉल्ड असते. याशिवाय 'गुगल प्ले'वर फोटो एडिटींगच्या अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.

www.divyamarathi.com द्वारा आपल्याला टॉप नऊ कॅमेरा अॅप्सची माहिती उपलब्ध करून देत आहोत. अँड्रॉइडसोबत ios अॅप्सचीही माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.