'फोर्ब्स इंडिया'ने 'टॉप 100' धनाढ्यांची यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या पाचमध्ये गुजराती उद्योजकांचा समावेश करण्यात आला असून रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.
परकी गुंतवणुकीचा ओघ सातत्याने चालू राहिल्याने सध्या शेअर बाजारात तेजी दिसत आहे. त्यातून एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, देशात सर्वाधिक धनाढ्यांमध्ये गुजराती व्यक्ती झळकल्या आहेत. त्यात रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी, सन फार्माचे दिलीप संघवी, अदानी समुहाचे गौतम अदानी, विप्रोचे अजीम प्रेमजी आणि शपूरजी पलोंजी समुहाचे पलोंजी मिस्री यांचा समावेश आहे.
'फोर्ब्स इंडिया'च्या यादीत मुकेश अंबानी यांनी सलग आठव्या वर्षी 'टॉप' केले आहे. मात्र, शेअर बाजारात तेजी दिसत असल्याने अन्य धनाढ्यांनी अंबानींचा पाठलाग सुरु केला आहे. संघवी आणि अंबानी यांच्या संपत्ती 5,052 कोटींचे अंतर आहे. तसेच अदानी आणि अंबानी यांच्यात 16,004 कोटींचे आहे. त्यामुळे अदानींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. 2013 मधील 'फोर्ब्स इंडिया'च्या यादीत अदानी हे 22 व्या स्थानी होते.
1- मुकेश अंबानीएकूण संपत्ती- 1,33,234 कोटी रुपये.
वय- 57
बिझनेस- पेट्रोकेमिकल्स, ऑइल आणि गॅस
रेसिडेन्स- मुंबई
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अन्य श्रीमंत गुजरातींविषयी...