आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Smartphone That Might Receive Android Update Soon

Android L 5.0 Os ने सगळ्यात आधी अपडेट करू शकता हे स्मार्टफोन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: Nexus 7)

Google ने Android L 5.0 अपडेट आजपासून (3 नोव्हेंबर) युजर्सला डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिले आहे. Nexus 6 आणि Nexus 9 या दोन्ही डिव्हाइस सुरुवातीपासून Android L 5.0 OS वर काम करतात. मात्र याशिवाय आजपासून Nexus 7 आणि Nexus 10 सह अनेक स्मार्टफोन्समध्ये Android L 5.0 डाउनलोड करता येईल.
Nexus सीरीजनंतर HTC च्या स्मार्टफोन्समध्ये New Android L 5.0 डाऊनलोड करून अपग्रेड करता येईल. आम्ही आपल्यासाठी काही स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत. त्यात सगळ्यात आधी Android L 5.0 डाऊनलोड करता येऊ शकेल.

1. Nexus
Google च्या घोषणेनुसार पुढील आठवड्यात Nexus 4, Nexus 5, Nexus 7 आणि Nexus 10 ला Android L 5.0 OS ने अपडेट करता येईल. Nexus 4 आणि Nexus 5 मध्ये Android L 5.0 OS अपडेट करता येईल की नाही, याबाबत माहिती समजू शकलेली नाही.

New Android L 5.0 आजपासून डाउनलोड करु शकतात युजर्स, वाचा 8 सुपर फीचर्स

2. HTC
HTC ने केलेल्या घोषणेनुसार, वर्ल्ड वाइल्ड HTC One M8 आणि HTC One M7 ला Android 5.0 L ने अपडेट करता येऊ शकते. गुगलद्वारा सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत युजर्सला अपडेट करता येईल. याचा अर्थ असा की, Android 5.0 L चे अपडेट्‍स फेब्रुवारीपर्यंत पाहायला मिळू शकतील.

3. SAMSUNG
SAMSUNG कोणत्या डिव्हाइसला अपडेट करेल, याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. Samsung Gallaxy S5 आणि Gallaxy Note 3 ला Android 5.0 L ने अपडेट करता येऊ शकते.


4. MOTOROLA
2014 पर्यंत Motorola च्या विविध डिव्हाइसेसला Android 5.0 L ने अपडेट करता येईल. सगळ्यात आधी Moto X आणि Moto G ला अपडेट करण्याची योजना Motorola कंपनीने आखली आहे. Moto G सोबत 4G LTE, Moto E, ड्रॉइड अल्ट्रा, ड्रॉइड मॅक्स, ड्रॉइड मिनी देखील अपडेट करता येईल.

5. LG
Android L 5.0 OS ने कोणते डिव्हाइस अपडेट केले जाऊ शकतात, असा खुलासा अद्याप LG ने केलेला नाही. LG G3 आणि G2 प्रो हे दोन स्मार्टफोन Android L 5.0 OS ने अपडेट करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, G2 आणि ऑरिजनल G प्रो हे फोन देखील अपडेट करता येऊ शकतात.

6. Sony
Android L 5.0 Os ने आपले कोणते डिव्हाइस अपडेट करता येतील, याबाबत Sony कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. Sony Xperia Z3, Xperia Z3 V आणि Xperia Z3 कॉम्पॅक्टला अपडेट करता येण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, Android L 5.0 ने सगळ्यात आधी अपडेट करू शकता हे स्मार्टफोन्स...