आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात या आठवड्यात लॉन्च झाले हे 8 स्मार्टफोन्स; किंमतींसोबत जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(LG G3)
गॅजेट डेस्क - स्मार्टफोन बाजारात यंदाचा संपूर्ण आठवडा धूमाकुळ घालणारा होता. कारण मागील सोमवार ते या सोमवार पर्यंत तब्बल 8 स्मार्टफोन्सने बाजारात एन्ट्री मारली आहे. हे सर्व फोन्स अत्याधुनिक फीचर्स सोबत अत्यंत आकर्षक आहेत. यामध्ये मागील सोमवारी LG G3 हा हाय रेंज स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे मिडरेंज स्मार्टफोन्सही लॉन्च झालेत. त्यामध्ये साऊथ कोरीयाची कंपनी असलेल्या LG ने आपला महत्त्वाकांक्षी G3 स्मार्टफोन 'बिग बी' एडिशनच्या नावाने लॉन्च केला आहे. LG च्या या ग्रँड इव्हेंटमध्ये खुद्द 'बिग बी' अमिताभ बच्चन उपस्थित होते. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे भारतात लॉन्च झालेल्या या 9 स्मार्टफोन्स बद्दल
1. LG G3-
किंमत- 47,999 रुपये
.या फोनमध्ये 5.5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन फुल QHD (1440*2560 पिक्सलचे रेजोल्यूशन) आहे. सोबतच या फोनमध्ये प्रति इंच 538 पिक्सल डेन्सिटी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मायक्रो सिमला सपोर्ट करतो. याशिवाय 2.5 GHz चे क्वाड कोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. या मध्ये युजरला दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये 16 GB इंटरनल मेमरी सोबत 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल मेमरीसोबत 3 GB रॅम असे हे पर्याय आहेत.
या फोनचे स्वीच फीचर या फोनला जास्तीत जास्त सुरक्षित बनवते. जर कोणी तुमचा फोन चालू करण्याचा प्रयत्न करेल, तर या फीचरमुळे त्याला हा फोन चालूच करता येणार नाही. हे फीचर सुरू होताच फोन आपोआप बंद (शट डाऊन) होतो.
या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यातील कॅमेरा 0.276 सेकंदातच कोणत्याही वस्तूवर फोकस करू शकतो. या फोनमध्ये फ्रन्ट कॅमेर्‍यासोबतच ऑटोमॅटीक सेल्फी फीचरही देण्यात आले आहे. G3 कॅमेर्‍यात चार बेसीक ऑप्शन आहे. यामध्ये ड्यूअल, पॅनारोमा, मॅजिक फोकस आणि ऑटो असे हे चार प्रकार आहेत. कॅमेर्‍याच्या मेनूमध्ये युजर्ससाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत, जे मागील फोन G2 पेक्षा अधिक सोयीस्कर आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर स्मार्टफोन्सबद्दल....