आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार रुपयांहून कमी किमतीचे 4G स्मार्टफोन्स, वाचा टॉप स्मार्टफोन्सचे फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Micromax ने आपला नवा ऑनलाइन ब्रांड YU नुकताच लॉन्च केला आहे. या ब्रांडच्या माध्यमातून Micromax ने आपला पहिला स्मार्टफोन यूरेका हा सायानोजेन मोड ऑपरेटिंग सिस्टमसोबत सादर करण्‍यात आला आहे. या 4G स्मार्टफोनची किंमत 8999 रुपये आहे. जानेवारी 2015 च्या दुसर्‍या आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
4G फीचरसह या फोनमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. भारतीय बाजारात 4G वर आधारित अनेक स्मार्टफोन्स आहेत. सगळे फोन 10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. त्यामुळे Micromax चा YU ब्रांडचा 'यूरेका' हा स्मार्टफोन या सगळ्या फोनला आव्हान देऊ शकतो.
divyamarathi.com आपल्यासाठी 4G स्मार्टफोन्सविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
Micromax YU Smartphone Yureka

किंमत- 8999 रुपये (3G), 9999 रुपये (4G)

फीचर्स-
4G सपोर्टवर हा फोन अवघ्या चार मिन‍िटांत फुल एचडी मूव्ही डाऊनलोड केला जाऊ शकतो. या डिव्हाइसवर कमाल 150MBPS ची स्पीड मिळतो, अशी माहिती Micromax चे फाऊंडर राहुल शर्मा यांनी दिली.

YU ब्रांड स्मार्टफोन यूरेका ई-कॉमर्स साइट 'अमेजन डॉट कॉम'वरून खरेदी केला जाऊ शकतो. YU ची प्री-बुकींग 19 डिसेंबरला दुपारी दोन वाजता सुरु होणार आहे. जानेवारी 2015च्या दुसर्‍या आठवड्यापासून विक्री सुरु होणार आहे. या फोनची किंमत 8999 रुपये आहे. फोनसोबत फ्री रिप्लेसमेंट आणि रिपेअर वॉरंटीदेखील देण्यात आली आहे. ‍रिपेअर आणि रिप्लेसमेंटची सर्व्हिस यूजर्सला घरी मिळणार आहे. मात्र, हा फोन फक्त ऑनलाइन खरेदी केला जाऊ शकतो.

मुख्य फीचर्स
* 64 बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसर
* 4G हॅंडसेट
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ले स्क्रीन, 80 डिग्रीचा व्यूइंग अँगल
* गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन, तीन पटीने स्क्रॅच रेजिस्टेंट
* अँडव्हान्स कनेक्टिव्हिटी
* LTE मोबाइल टीव्ही ब्रॉडकास्ट
* एड्रिनो 405 GPU
* 13MP रियर आणि 5 MPचा फ्रंट कॅमेरा
* 1.7 GHz (गीगाहर्ट्ज) का ऑक्टा-कोर प्रोसेसर

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, अन्य स्मार्टफोन्समधील फीचर्स...