आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंपन्यांनी बदललेत आपले LOGO, जाणून घ्या, त्यामागची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतीकात्मक फोटो)
गॅजेट डेस्क - नुकतेच मायक्रोसॉफ्टने त्यांच्या 20 वर्ष जुन्या वेबसाईटला रिलॉन्च केले आहे. 20 वर्षांपूर्वी जवळपास सर्वच वेबसाईट एकसारख्या होत्या. मायक्रोसॉफ्टची ही वेबसाईट 1994 ची होती. त्यानंतर मायक्रोसॉफ्टने वेबसाईटमध्ये अनेक बदल केले आहे. एवढेच नाही तर मायक्रोसॉफ्टचा लोगोही कालांतराने बदलत गेला. कोणत्याही ब्रँडसाठी त्यांच्या प्रोडक्ट एवढाच त्यांचा लोगोही महत्त्वाचा असतो. काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांही अशा आहेत, ज्यांचे लोगो सुरूवातीच्या काळात वेगळेच होते आणि आता खुपच वेगळे आहेत. काही वर्षांपूर्वी अॅपलने गे प्राईडला सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या लोगोमध्ये इंद्रधनुष्याचा रंग लावला होता. या लोगोमध्ये अॅपलने अनेक रंगांचा वापर केला होता.
मायक्रोसॉफ्ट, अॅपल यांसारख्या टेक्नॉलॉजी कंपनींनी आपल्या लोगोमध्ये वेळोवेळी अनेक बदल केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच कंपन्यांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी आपल्या लोगो डिझाईनवर अनेक संशोधन करून, लोखो रुपये खर्च करून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. ह्या सर्वच टेक कंपन्या सुरूवातीच्या काळात त्यांच्या त्या काळच्या लोगोमुळे ओळखले जात होत्या. मात्र त्या लोगोमध्ये बदल केल्यानंतर आता या कंपन्यांनी खुपच मोठी भरारी घेतली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, कोणकोणत्या आहेत या कंपन्या.. ज्यांनी आपल्या लोगोमध्ये बदल केले आहेत...